Home जळगाव अशी नको ग सुनबाई ???

अशी नको ग सुनबाई ???

413
0

 

 

पोलिसांनी सुनेला ठोकल्या बेड्या ,

अमीन शाह ,

भुसावळ जि . जळगाव : घरगुती भांडणातून सूनेनेच सासूच्या डोक्यात व पाठीवर विळयाने वार करुन तिचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी ६.४० वाजेच्या सुमारास प.क.कोटेचा विद्यालयाच्या आवारात घडली . प्रकरणी सून उज्ज्वला सोनवणे ( ३८ ) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . या द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे ( ७५ ) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे . मिळालेल्या माहितीनुसार , रवीद्र सोनवणे हे कोटेचा विद्यालयात सुरक्षा रक्षक आहेत . शाळेच्या परिसरातच ते आई , पत्नी उज्ज्वला हिच्यासह वास्तव्यास आहेत सकाळच्या सुमारास रवींद्र हा काही साहित्य घेण्यासाठी गावात गेला होता . त्याचवेळी द्वारकाबाई व सून उज्ज्वला यांच्यात भांडण झाले . हे भांडण एवढ्या विकोपाला गेले की सूनेने धारदार विळ्याने सासूची मान , डोके व पाठीवर जोरदार वार केले . अचानक झालेल्या या हल्ल्यात द्वारकाबाई जागीच ठार झाल्या . काही वेळाने रवींद्र हा घरी परतला . त्यावेळी आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली . यानंतर रवींद्र हा ओळखीच्या नगरसेवकाकडे गेला . नगरसेवकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली . यानंतर काही क्षणातच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले

Previous articleप्रियकराने प्रेयसीचा दगडाने मारून केला खून
Next articleआंबेडकर स्टुडंट् असोसिएशन ने घेतली कुलगुरूंची भेट 
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.