Home नांदेड प्रियकराने प्रेयसीचा दगडाने मारून केला खून

प्रियकराने प्रेयसीचा दगडाने मारून केला खून

197
0

मजहर शेख – प्रतिनिधी

पळून जाण्याच्या तयारीत असताना जमावाने रोखले

आरोपी

नांदेड/किनवट,दि : २:- एका प्रियकराने आपल्या मुलांकडे जाण्याच्या कारणावरून प्रेयसीला जंगलात नेऊन दगडाने ठेचून तिचा खून केल्याची घटना किनवट तालुक्यातील वडोली जंगल परिसरात घडली आहे.

किनवट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजकुमार रामेश्वर भोळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वडोली ता.किनवट येथील दत्तमंदिराकडे जाणाऱ्या जंगलातील रस्त्यावर (ता.एक) जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बबीता मंगेश आडे (३२) राहणार लसनवाडी ता.माहूर या महिलेचे प्रेत सापडले.तिच्या डोक्यावर दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता.किनवट पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पंकज सुभाष जाधव (वय ४६) रा.पलाईगुडा ता.माहूर ह.मु.सुरदासपूर मंडल नेरडगुंडा जिल्हा आदिलाबाद याने तिचा खून केला होता.बबीता आडे ही पंकज जाधवची प्रेयसी होती.(ता.एक)जून रोजी पंकज जाधवच्या मुलांना भेटण्यासाठी पालाईगुडाला का येत नाही.या कारणावरून प्रियकर आणि प्रेयसीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि या भांडणातून माथेफिरू प्रियकराने तिला दगडाने डोक्यावर ठेचून तिचा खून करून टाकला.
किनवट पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिते नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरिक्षक थोरात यांच्याकडे देण्यात आला आहे.पोलीसांनी आरोपी पंकज सुभाष जाधवला घटनास्थळावरूनच अटक केली आहे.दरम्यान मयत प्रेयसीसोबत भांडण करून खून केल्यानंतर आरोपीला जमावाने पोलिस येईपर्यंत जागेवरच रोखून धरले होते.

Previous articleनवरा असतांना तिने पर पुरुषाशी प्रेम केलं अन, विपरितच घडलं,
Next articleअशी नको ग सुनबाई ???
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.