Home बुलडाणा सरकारची गॅस ची सबसिडी की ग्राहकांशी खेळत आहे सापशिडी..?

सरकारची गॅस ची सबसिडी की ग्राहकांशी खेळत आहे सापशिडी..?

135
0

सबसिडीची आशा दाखवून गॅसचे भाव गगनाला

उजवला योजनेच्या नावाखाली कॉरोशिंन गायब

प्रतिनिधी – रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा :- एका सिलेंडरला २४९ रुपये सबसिडी देण्याची घोषणा एकीकडे शासनाने केली होती मात्र सबसिडी ९ रुपये ९५पैसे फक्त .सबसिडीची आशा दाखवून गॅसचे भाव गगनाला भिडले.मात्र लाभार्थ्यांना सबसिडीचे पैसे काही पूर्ण मिळाले नाहीत. तब्बल दहा महिन्यापासून गॅस सबसिडीचे केवळ ९ रुपये ९५ पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. बाकी सबसिडी अद्याप मिळाली नाही.जिल्हातील हजारो लाभार्थ्यांचे दहा महिन्यांपासून गॅस सबसिडीचे कोट्यवधी रुपये अद्याप जमा झाले नसल्याची बाब समोर आली आहे.मे २०२० मध्ये सबसिडी न घेता एक गॅस सिलेंडर ५९५ रुपयांना मिळाले. त्यांनतर जुलै २०२० मध्ये एक सिलेंडर ६१८रुपयांना देऊन सबसिडीचे ८ रुपये ४५ पैसे जमा केले. ऑगस्टमध्ये एक सिलेंडर ६२० रुपयांना देऊन सबसिडीचे ९ रुपये ९५ पैसे जमा झाले.डिसेंबरमध्ये गॅस सिलेंडरचा भाव ६७० रुपये वाढवूनही सबसिडीचे ९ रुपये ९५ पैसे जमा केले.जानेवारी २०२१ मध्ये गॅस सिलेंडरचा भाव ७२० रुपये, फेब्रुवारीमध्ये ७४५ रुपये व मार्चमध्ये तब्बल ८४५ रुपये भाव वठवूनही सबसिडीचे ९ रुपये ९५ पैसे गॅस लाभार्थ्यांना मिळाले आहेत. एका सिलेंडरला २४९ रुपये सबसिडी देण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र असे दिसून येत नाही. आता अत्यल्प सबसिडी वर समाधान मानावे लागणार आहे असे वाटते