Home पश्चिम महाराष्ट्र पोलीस विभागाच्या न्याय व हक्कासाठी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती मैदानात

पोलीस विभागाच्या न्याय व हक्कासाठी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती मैदानात

322
पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पोलीस विभाग,पोलीस परिवार महाराष्ट्र राज्यातील सर्व संरक्षण दल व सर्व सामन्य नागरिक यांच्या न्याय हक्कासाठी, व त्यांना होत असलेल्या समस्या साठी संस्थापक अध्यक्ष-मा.डाँ संघपाल उमरे सर,महाराष्ट्र राज्य सचिव-मा.विनोद पत्रे सर यांच्या आदेश्याने व महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार-मा.सुभाष दादा सोळंके पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.हजी अस्लम सैयद सर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा मा.माधुरी गुजराथी मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा रंजिता ओतारी,व जिल्हा अध्यक्ष नदिम उंदरे यांच्या नेतृत्व खाली दि.3 एप्रिल २०२१ ला रत्नागिरी जिल्हातील चिपळुण तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरिक्षक श्री.देवेन्द्रजी पोळ यांच्या मार्फेत नांदेड येथे पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर तलवारिने केलेल्या भ्याड हल्ल्यातील संबंधित व संशयितांवर भादवी ३०७ गुन्हे अंतर्गत तात्काळ कारवाई करण्यात यावी या संदर्भात.पोलीस मिञ परिवार समन्वय समिती तर्फे मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी पोलीस निरिक्षक पोळ साहेबांनी “आमच्या समस्या महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सचिव यांनी भेट घेऊन व निवेदनही दिले,नांदेड व आमच्या ईरतही समस्या शासनाच्या वेळोवेळी निर्दशनात आणुन देत आहे.कोणीतरी आम्हाला व आमच्या परिवाराला न्याय मिळवुन देण्यासाठी आमच्या पाठीशी आहे पुढेही असच सदैव उभ राहाव अशी अपेक्षा करुन त्यासाठी पोलीस मित्र परिवार समिती करित असलेल्या कार्याबाबत कैतुक केले,सोबतच आभार व धन्यवाद व्यक्त केले. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र महीला उपाध्यक्ष-सौ रंजिता ओतारी.आणि जिल्हा अध्यक्ष-नदिम उंडरे सर व विभागातील पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे पदधिकारी उपस्थित होते.