Home महत्वाची बातमी पत्रकारांना टोल माफीची बातमी म्हणजे एप्रिल फुलच??

पत्रकारांना टोल माफीची बातमी म्हणजे एप्रिल फुलच??

1505

सोशल मिडियावरती फिरत असलेल्या कुठल्याही पेपर कडिंग ‌वरती वृत्तपञाचे नाव व दिनांक नमुद नाही…!

यवतमाळ – “महाराष्ट्रातील पत्रकारांना महामार्गावर टोल माफी देण्याचा , अप़घात झाल्यास पाच लाख रूपये विमा कवच देण्याचा निर्णय मा. श्री. नितीन गडकरी यांनी घेतल्याची बातमी मागील दोन दिवसापासुन सोशल मिडियावर फिरत आहे.
ती बातमी म्हणजे एप्रिल फुलंच??
तसेच या विषयाची माहिती घेण्याकरीता गडकरी यांच्या ऑफिसला कॉल केला पण काही प्रतिसाद मिळाला नाही . रस्ते विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर बातमीची सत्यता तपासुन असा कोणताही अध्यादेश काढण्यात आलेला नाही. दुसरी गोष्ट अशी की केंद्र सरकार एकट्या महाराष्ट्रासाठी असा निर्णय घेण्याचे कारण नाही. बातमीत सिंधुदुर्गच्या पत्रकारांचे शिष्टमंडळ दिल्लीत गेल्याचा उल्लेख आहे. सिंधुदुर्गच्या पत्रकारांचे असे कोणतेही शिष्टमंडळ दिल्लीला गेले नाही किंवा नितीन गडकरी यांना भेटले नाही , त्यामुळे सोशल मिडियावरील बातमीवर कोणी विश्वास ठेऊ नयेे .

सध्या वृत्तपञाची विश्वासार्हता अगोदरच धोक्यात आलेली आहे अशा स्थितीत वृत्तपञांनी एप्रिल फुल सारखा करू नये.