Home विदर्भ कर्तव्यात समाधान शोधणारी खाकी वर्दी…!

कर्तव्यात समाधान शोधणारी खाकी वर्दी…!

640

यवतमाळ – जगात कोरोना विषाणू्ने कहर केलाय.. भारत सुद्धा अपवाद नाही.. कोरोनाला हरविण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणारी यंत्रणा सज्ज झाली.. त्यापैकी दिवसरात्र रस्त्यावर असणारे महाराष्ट्र पोलीस अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संकटांचा सामना करीत आहे.. यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलिसांचं बोलकं छायाचित्र सारं काही सांगून जातं.. रस्त्यावर नाष्टा…भोजन सुद्धा रस्त्यावरच.. अगदी कुटुंबापासून दूर.. परिस्थितीवर मात करीत जीव धोक्यात घालून पहारा देतात.. सर्वत्र ताणतणाव असताना ‘ त्या ‘ महिला पोलीस भगिणीसह पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य संकटाशी दोन हात करण्याची ऊर्जा देते.. कर्तव्यात समाधान शोधणारी.. देशसेवेसाठी समर्पित असलेली ही खाकी वर्दी.. ‘त्या ‘ खाकी वर्दीतील सेवकांना मानाचा मुजरा…!

छाया: शेखर वांढरे (यवतमाळ पोलीस)
शब्दांकन: सुनील आरेकर, दारव्हा.