Home विदर्भ आर्णी तालुक्यातील अंतरगांव येथील विपुल जाधव याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र...

आर्णी तालुक्यातील अंतरगांव येथील विपुल जाधव याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला…!

181
0

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) – पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ईचोरा येथील बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी विपुल उल्हास जाधव याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहीउद्दीन एम. ए. यांनी फेटाळला आहे. या प्रकरणात शासनाकडुन सहाय्यक सरकारी वकील अँड. उदय के. पांडे यांनी युक्तिवाद केला तर, आरोपीतर्फे अँड. एम. ए. कावळे यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ताले हे पुढील तपास करीत आहे.
पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ईचोरा येथील अल्पवयीन मुलगी 4 फेब्रुवारी रोजी शाळेत गेली होती. परंतु; सदर मुलगी दुपारी 4 वाजे पर्यंत घरी परत न आल्याने तीचा नातेवाईक व मैत्रिणीकडे शोध घेण्यात आला. मात्र, ती मिळाली नसल्याने मुलीचे वडील रवि शंकर राठोड याने पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या वरून आरोपी विपुल उल्हास जाधव (अंतरगांव), प्रविण राठोड, देवकुमार आडे, विधी संघर्ष बालक, अजय राठोड आदीं 5 आरोपी विरुद्ध भादंवि 363, 366, 376 (N), 506, 34 व पोस्को कायद्यांतर्गत कलम 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मुलीच्या वडिलांनी पुन्हा मुलीचा शोध घेतला असता, आरोपी प्रविण राठोड, देवकुमार आडे, विथी बाल संघर्ष, अजय राठोड या चोघांनी त्या अल्पवयीन मुलीला अंतरगांव फाट्यावर घेऊन गेले. तेथे पुर्वी पासुनच आरोपी विपुल जाधव हा हजर होता. तेथे गेल्यावर त्या अल्पवयीन मुलीला विपुल ने आपल्या दुचाकी वाहनावर बसवून अंतरगांव जवळील नाल्यावर तिच्यावर अतिप्रसंग केला, असे बयान सदर अल्पवयीन मुलीने पारवा पोलीस ठाण्यात नोंदविले. तसेच तिने पुरवणी बयानात आणखी चार आरोपींचे नांव सांगीतले होते. त्यानंतर यातील आरोपीतांनी त्या अल्पवयीन मुलीला मारोती ओमणी या वाहनाने नांदेड, औरंगाबाद व नंतर किनवट येथे नेले. आरोपी विपुल जाधव व अल्पवयीन मुलगी हे दोघेही किनवट येथे पारवा पोलिसांना मिळून आले. पारवा पोलीसांनी विपुल जाधव यांस अटक करून अल्पवयीन मुलीली वडीलाच्या स्वाधीन केले. फरार आरोपींचा शोध पारवा पोलीस घेत आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रविंद्र ताले हे करीत आहे.