Home पुणे पानशेत धरणात कार पडून आई, 3 मुलींना जलसमाधी; वडिलांना वाचवण्यात आले

पानशेत धरणात कार पडून आई, 3 मुलींना जलसमाधी; वडिलांना वाचवण्यात आले

231
0

पुणे:पानशेत धरणात कार पडून आई, 3 मुलींना जलसमाधी; वडिलांना वाचवण्यात आले

 

पुण्यातील पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक कार कोसळून आई आणि ३ मुलींचा मृत्यू झाला, तर त्यांच्या वडिलांना वाचवण्यात आले आहे. पानशेत भागातील कुरंट फाटा परिसरात ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेत अल्पना भिकुले (४५) तसेच त्यांच्या मुली प्राजक्ता (२१), प्रणिता (१७) आणि वैदेही (८) यांचा बुडून मृत्यू झाला. यात विठ्ठल भिकुले हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणात कार कोसळल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली. हे कुटुंब वेल्हे तालुक्यातील आपल्या गावाहून पुण्याकडे परतत होते. कार पुणे-पानशेत रस्त्यावरून जात असताना ती रस्त्यावरून अचानक पाण्यात कोसळली. या ठिकाणी रस्त्याला वळण असल्यामुळे वळणावर कारचालकाचा तोल गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.