Home रायगड सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार-२०२१ कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांस प्रदान..

सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार-२०२१ कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांस प्रदान..

136
0

महाड पोलादपुर-जुनेद तांबोळी

शिवजयंती पासून दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीला, तसेच मेघडंबरी आणि होळीचा माळ येथील पुतळ्याला दररोज नियमितपणे पुष्पहार अर्पण करण्याच्या संकल्प करून त्यांची अंमलबजावणी सुरू केल्याबद्दल आणि शिवजयंती निमित्ताने गडावर आकर्षक रोषणाई केल्याबद्दल नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार – २०२१ने सन्मानित

‘       गड आला पण सिंह गेला’ या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या उक्तीनुसार “आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं” असं म्हणून स्वामीकाजास्तव देह समरांगणी अर्पण करणारे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५१ वा शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा शनिवार दिनांक ०६ मार्च २०२१व दि. ०७ मार्च २०२१ या कालावधीत एतिहासिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      याच कार्यक्रमात मागील शिवजयंती पासून दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीला व मेघडंबरी आणि होळीचा माळ येथील पुतळ्याला दररोज नियमितपणे पुष्पहार अर्पण करण्याच्या संकल्प करून त्यांची अंमलबजावणी सुरू केल्याबद्दल आणि शिवजयंती निमित्ताने गडावर आकर्षक रोषणाई केल्याबद्दल नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार – २०२१ कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांना प्रदान करण्यात आला.  मागील आठवड्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने व ते सध्या क्यारंटाईन असल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून  मंगेश चिवटे – कक्षप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी पुरस्कार स्वीकारला. महाड – पोलादपूरचे विद्यमान शिवसेना आमदार श्री भरतशेठ गोगावले यांच्या आणि सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज श्रीमती शीतलताई मालुसरे , चिरंजीव श्री रायबा मालुसरे यांच्या हस्ते हा पुरस्कार करण्यात आला. 

    यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री चंद्रकांत कळंबे , ( पोलादपूर ) दुर्ग अभ्यासक डॉ अमर आडके,( कोल्हापूर )  श्री सिद्धेश पाटकर ( महाड ) यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.