Home रायगड पोलीस बॉईज असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष पदी समीर धुपकर यांची निवड

पोलीस बॉईज असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष पदी समीर धुपकर यांची निवड

297
0

पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केले जाहीर

रायगड – दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस बॉईज असोसिएशनच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी येथील पोलीस बॉईज समीर राजाराम धुपकर यांची निवड केल्याचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे

समीर धुपकर यांनी या अगोदर पोलीस मित्र म्हणून काम केले आहे, तसेच या माध्यमातून त्यांनी पोलीस बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत, त्यामुळे त्यांचे हे उल्लेखनीय कार्य पाहून त्यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे

समीर धुपकर यांच्या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत