Home विदर्भ घाटंजी तालुक्यातील ससाणी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक वाद…!

घाटंजी तालुक्यातील ससाणी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक वाद…!

409
0

33 आरोपी विरूध्द घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल..!


———————————-
अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील ससाणी येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूकी दरम्यान झालेल्या प्रोसीडींग, हजेरीपत्रक, मोबाईल ईत्यादी जबरीने हिसकुन नेल्या प्रकरणी सरपंच, उपसरपंच निवडणूक अध्यासी अधिकारी लखन मेंडोले यांच्या रिपोर्ट वरुन संशयीत आरोपी ग्रामपंचायत सदस्य दिलीप नगराळे सह 33 नागरीकांविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भादंवि 395, 353, 143, 144, 147,149 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 तसेच आणि दंड संहितेच्या 1860 चे कलम 188, 269, 270 अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले असून ग्रामपंचायत सदस्य दिलीप नगराळे सह पांच आरोपींना घाटंजी पोलीसांनी अटक केल्याचे तपास अधिकारी किशोर भुजाडे यांनी सांगितले आहे. घटनास्थळी घाटंजीचे तहसीलदार पुजा एस. माटोडे, ठाणेदार बबन कराळे, पोलीस उप निरीक्षक किशोर भुजाडे यांनी तातडीने भेट दिली असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
◼️तालुक्यातील ससाणी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूकी दरम्यान आशीस भोयर गटातर्फे सरपंच पदासाठी रामाजी पोटे, तर उपसरपंच पदासाठी आशीष भोयर आणि विरोधी गटातर्फे सरपंच पदासाठी दिलीप नगराळे, तर उपसरपंच पदासाठी योगीता रोकडे सह पांच सदस्यांनी निवडणूक अध्यासी अधिकारी लखन मेंडोले यांच्या समक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या वेळी ग्रामसेवक अमोल जंगमवार हे सुध्दा ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते. मात्र, दिलीप नगराळे गटाच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी नसल्याने तसेच वेळ संपल्याने नगराळे व रोकडे यांचा उमेदवारी अर्ज अध्यासी अधिकारी लखन मेंडोले यांनी ना मंजूर केला.
◼️त्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले या दरम्यान ससाणी येथील सुरेश नामक व्यक्तीने गावातील ३२/३३ नागरीकांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात घुसून निवडणूक अध्यासी अधिकारी लखन मेंडोले यांच्यासोबत वाद घालुन धक्का बुक्की करुन जिवे मारण्याची धमकी दिली व सरपंच, उपसरपंच निवडणूकीचे प्रोसीडींग रजिष्टर, हजेरीपत्रक, अध्यासी अधिकारी यांचा मोबाईल जबरीने हिसकाउन घेऊन गेले या प्रकरणी अध्यासी अधिकारी लखन मेंडोले यांनी दिलेल्या लेखी रिपोर्ट वरुन ससाणी येथील जवळपास ३०/३५ नागरिकां विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक किशोर भुजाडे हे करीत आहे.