Home बुलडाणा गारपीटग्रस्त भागाची राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी केली पाहणी ,

गारपीटग्रस्त भागाची राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी केली पाहणी ,

238

 

गहू हरभरा मका पिकासाठी हेक्टरी 59 हजार रुपये तर फळबाग कांदा नेट साठी 1 लाख रुपये तातडीची मदत द्या ,

 

सिंदखेडराजा , प्रतिनिधी
बुलढाणा जिल्यात दिनांक 19 व 20 रोजी अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 18 हजार हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नुकसान ग्रस्त सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, झोटींगा देऊळगाव कोळ, डोरव्ही आदी भागातील अवकाळी पाऊस गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी यांनी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसू बघितले क्षणात होत्याच नव्हते झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने गहू हरभरा मका या पिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये तर फळबाग कांदा पिकासाठी 1 लाख रुपये तसेच नेट शेड साठी 1 लाख रुपये तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी अँड , नाझेर काझी यांनी केली असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले
जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शेतात उभे असलेले हरभरा गहू मका चे पीक कांदा पिक अक्षरशा झोपली फळबाग पीक आंबा मोहर गळून गेला नेट शेड उध्वस्त झाले प्रचंड नुकसान झाले आतील पिकाचे प्रचंड नुकसान झाले टरबूज काकडी टोमॅटो मिरची आदी चे पिक या अवकाळी पावसाचा गाराचा मार लागल्याने खराब झाली गळून पडली आहे सिंदखेड राजा तालुक्यात सुमारे साडेचार हजार हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असून यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकेल असा अंदाज आहे आज एडवोकेट नाझेर काझी यांनी मलकापूर पांग्रा देऊळगाव कोळ डोरली आदी भागातील शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतातील नुकसान पाहून तेथील परिस्थितीचा अंदाज आला शेतकऱ्यांनी झालेल्या गारपीट च आणि अवकाळी
आपबीती सांगितल्याने सर्वांच्या डोळ्यात आसवे आली त्यामुळे या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मदत करावी त्यानंतर सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसानी संपूर्ण मदत द्यावी अशी मागणी अँड नाझेर काझी यांनी केली यावेळी पाहणी करताना त्यांच्यासोबत राका तालुकाध्यक्ष शिवाजी राजे देशमुख राका विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष एडवोकेट संदीप मेहेत्रे पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे यांचे स्वीय संभाजी पेटकर सरपंच भगवानराव उगले माजी सरपंच अहमद यारखा आदर्श कास्तकार बंडू उगले देऊळगाव कोळ सरपंच राजू गायकवाड संजय गायकवाड उद्धव गायकवाड डोरव्ही सरपंच बाळू पवार उपसरपंच मुरकुट माजी सरपंच उद्धव शेळके वसंत मुरकुट तुकाराम पंखुले रत्नाकर पंखुले दिनकर सोळंके गजानन शेळके प्रकाश मुरकुट अनिल मुरकुटे गणेश मुरकुटे अमोल साळवे आदी उपस्थित होते.