Home बुलडाणा दुसरी बायको करण्यासाठी पहिल्या पत्नीला मारहाण

दुसरी बायको करण्यासाठी पहिल्या पत्नीला मारहाण

412

 

सैनिका  विरुद्ध गुन्हा दाखल

( प्रतिनिधी रवि जाधव )

देऊळगाव राजा – पत्नीला वडील नाही व तिच्या घरची परिस्थिती हालकीची आहे . तसेच आपण फौज मध्ये नौकरी करतो म्हणून दुसरी बायको करण्यासाठी पत्नीचा पैसासाठी मानसिक व शारीरिक छळ करुण मारहाण केली अशा महिलेच्या तक्रारीवरून ठाणेदार यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंचरवाडी येथील सौ माधुरी गणेश लष्कर वय २८ वर्ष रा.जामवाडी जि जालना ह.मु. आंचरवाडी या महिलेचा पती गणेश मोतीराम लष्कर हा फौज मध्ये नौकरीला आहे . परंतू दुसरी बायको करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जाणीव पूर्वक तू तुझ्या माहेरवरून पैसे घेवून ये आपल्याला घर घ्यायचे आहे . असे म्हणून पतीने कोऱ्या स्टॅम्प पेपरवर तसेच काही कागदपत्रावर सह्या घेतल्या . आणि काही शुल्लक कारण काढून शारीरिक व मानसिक छळ करुण मारहाण करीत असे . मात्र महिलेला वडील नसल्याने ती सर्वकाही पतीचा त्रास सहन करीत असे मात्र कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही उलट पत्नी म्हणून सोबत राहू दिले नाही त्यामुळे महिला तक्रार विभागाकडे न्याय मागितला असता त्यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला पाठविले . महिलेने घडलेली सर्व हकीकत ठाणेदार राजवंत आठवले यांना सांगितली . या महिलेच्या तक्रारीवरून ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार पंजाबराव साखरे यांनी आरोपी गणेश मोतीलाल लष्कर, मोतीलाल संपत लष्कर,सौ. सुनीता मोतीलाल लष्कर, सुरेश मोतीलाल लष्कर,सौ. राधा सुरेश लष्कर,सौ. रेखा अंबादास पिटकार सर्व रा जामवाडी जि जालना यांच्या विरुद्ध अप नं ३१/२१ कलम ४९८ अ, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.