Home बुलडाणा मृत्यू केंव्हा अन कुठे येईल काही सांगता येत नाही ???

मृत्यू केंव्हा अन कुठे येईल काही सांगता येत नाही ???

677
0

 

अमीन शाह

बुलडाणा : मकरसंक्रांत असल्याने ती ग्रामदैवत श्री कामाक्षी देवीच्या मंदिरात गेलेली अन् तिथेच तिला पतीचा अपघातात मृत्यूची झाल्याची बातमी कळली … शेतात झाडाखाली आराम करणाऱ्या युवकाला नियंत्रण सुटलेल्या ट्रकने चिरडले . ही घटना किनगाव राजा- दुसरबीड मार्गावरील ब्ल्यू डायमंड हॉटेलसमोर 14 जानेवारीला दुपारी घडली . माधव नारायण झोरे 36 , रा . किनगाव राजा असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे . दुपारच्या सुमारास माधव शेतातील बाभळीच्या झाडाखाली झोपला होता . त्याचदरम्यान ब्ल्यू डायमंड हॉटेलसमोर ट्रकचालक रिव्हर्स घेण्याच्या नादात ट्रकवरील नियंत्रण हरवून बसला आणि ट्रक थेट शेतात घुसून माधवच्या अंगावरून गेला . यात माधवचा जागीच मृत्यू झाला . नागरिकांनी आरडाओरड केली . ट्रकचालक फरारी झाला . किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला . या प्रकरणी मृतकाचा भाऊ मैनाजी नारायण झोरे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . माधव यांच्या मागे पत्नी , दोन लहान मुले असा परिवार आहे .