Home उत्तर महाराष्ट्र चांदेकसारे येथे चैतालीताई काळे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न

चांदेकसारे येथे चैतालीताई काळे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न

180

मधुकर वक्ते कोपरगाव

अहमदनगर  –  रविवार दि. १० / १ / २०२१ रोजी चांदेकसारे गावात आ.आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या उपस्थित व जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल,आ.आशुतोष दादा काळे मित्र मंडळ यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबीराचेआयोजित करण्यात आले होते.
जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. या कठीण काळाची गरज ओळखणे गरजेचे आहे.आमदार आशुतोष दादा काळे यांनी कोपरगांवातील सर्व तरूण मंडळानां रक्त दान शिबीर आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. त्याच अनुशंगाने चांदेकसारे येथे आशुतोष दादा काळे मित्र मंडळ व जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने भव्य रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
अहमदनगर जिल्हा बॅकेच्या संचालिका सौ चैताली ताई काळे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की रक्तदान हेच जीवनदान असुन रक्तदानाचे महत्त्व रुजविणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
त्यापुढे म्हणाल्या की शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे गरजेचे असुन वर्षातुन दोनदा अशा प्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे असुन जोगेश्वरी इंटरनॅशल स्कुल व आशुतोष दादा मित्र मंडळ यांनी राबविलेला उपक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
या शिबिरास अहमदनगर जिल्हा बॅकेच्या सचांलिका सौ चैताली ताई काळे या प्रसंगी उपस्थित होत्या, तसेच माजी सरपंच केशवराव होन, काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण , दुर्गा नाना होन,भिमा बारकू होन,सय्यद बाबा शेख, मोहन भाऊ गुजर,आर आर होन,नुरमोहम्मद शेख,कल्याण सर होन,बाबासाहेब होन,शरदराव होन, किरण आप्पा होन,नितीन दगु होन,अशोक सर होन, पंकज होन,राजेंद्र खरात, विश्वनाथ सोळसे, सरदार भाई सय्यद, सुनिल खरात, उध्दव होन, सुधीर चव्हाण, जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चे सचिव सुनिल भास्कर होन, सय्यद बाबा शेख सिताराम होन, भिमा तात्या होन आर आर पाटील होन मोहन भाऊ गुजर किशोर होन पंकज होन दिपक रोकडे शंकर चव्हाण जगदिश होन अर्जुन बोरावके साई जाधव डाॅ ढोका, डाॅ सौ निता पाटील, अमोल धिवर, विराज गायकवाड, उत्तरेश्वर कावळे, योगेश पगारे, आसिफ शेख, रेणुका आैटी,दुर्गा पगारे, प्रतिक्षा साबळे,बाबासाहेब गुजर ,सौरभ सोळसे प्रसाद सोळसे, सदिंप गोरे,सुहास होन मच्छिंद्र खरे ,प्रदीप होन,
आसिफ शेख सुनिल शिरसाठ आदी संजिवनी ब्लड बॅकेचे कर्मचारी उपस्थित होते.
या शिबीरानंतर आपल्या गावातील च नव्हे तर कोपरगाव तालुक्यातील कोणत्याही गरजू ला रक्ताची आवश्यकता भासल्यास आपण आमच्याशी संपर्क साधवा व आज मिळालेल्या कार्ड वर आपल्याला पाहीजे त्या गटाचे रक्त काही मिनिटांत उपलब्ध होईल.अशी माहीती सुनिल होन यांनी या वेळी दिली.