Home विदर्भ लेखनीच्या माध्यमातुन न्याय मिळावा – क्रांती धोटे

लेखनीच्या माध्यमातुन न्याय मिळावा – क्रांती धोटे

69
0

यवतमाळ – दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जाम्भेकर यांच्या जयंती निमित्ताने आज 6 जानेवारी 2021 रोजी पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. देश व समाजाच्या प्रत्येक घटकासाठी,वंचित,शोषित व उपेक्षिताना आपल्या लेखनीच्या माध्यमाने न्याय मिळावा यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे,लोकशाहीचे चौथे स्तम्भ म्हणून सदैव कार्यरत राहणाऱ्या पत्रकार बंधूँचा सम्मान व्हावा यासाठी ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा क्रांति धोटे- राऊत ,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मो. तारिक साहिर लोखंडवाला यांच्या वतीने एकवीरा लॉन येथे पत्रकार सत्कार व स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता , आचार्य
बाळशास्त्री जाम्भेकर विदर्भविर स्व.भाऊ जाम्बुवन्तराव धोटे ,  यांच्या स्मृतिस अभिवादन व दिप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.या प्रसंगी ,,जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, क्रांतिताई धोटे राऊत , जि.प. चे उपाध्यक्ष बालासाहेब कामारकर मो. तारिक साहिर,लालजी राउत यांच्या प्रमुख उपस्थितित पत्रकार दिवसानिमित्त यवतमाळ शहरातील सर्व ज्येष्ठ पत्रकार,प्रिंट,इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातील प्रतिनिधि पत्रकार यांचा,शाल,पुष्पगुच्छ व लेखनी,दैनंदिनी देवून गौरव करण्यात आला तसेच या प्रसंगी प्रसार माध्यमातील प्रतिनिधि व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.