Home नांदेड यांत्रिक युगात पत्रकारांनी बदल घडून आणणे गरजेचे आहे तसेच आव्हाने पेलण्यासाठी सज्ज...

यांत्रिक युगात पत्रकारांनी बदल घडून आणणे गरजेचे आहे तसेच आव्हाने पेलण्यासाठी सज्ज राहावे – डॉ.विनय सहस्त्रबुद्धे

87
0

  राजेश एन भांगे

नांदेड – पत्रकार सन्मान सोहळा थाटात संपन्न झाला असता यावेळी बोलताना, यांत्रिक युगात पत्रकारांनी स्वतःत बदल घडवून आणणे गरजेचे आहे. काळानुसार सर्वांनी बदल केले पाहिजे. तसेच बदलती आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सज्ज राहावे असे प्रतिपादन खा.डॉ. विनय सहस्बुद्धे यांनी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड येथे आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यात केले.

दर्पण दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्याचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावतीने दि.९ जानेवारी रोजी आनंद सागर मंगल कार्यालयात जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री सहस्त्रबुद्धे बोलत होते. येणार काळ का माध्यमात काम करणाऱ्या सर्वच पत्रकारांसाठी मोठा आव्हान उभे करणारा आहे. लॉकडाऊनमध्ये अणेक माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना आपली नौकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील आव्हानं लक्षात घेता पत्रकारांनी स्वतःला सर्वांगीण दृष्टीने तयार करावे. त्यासोबत आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी छोटे मोठे जोड व्यवसाय सुरू करण्याचीही तयारीही यापुढे पत्रकारांनी ठेवावी अस श्री सहस्त्रबुद्धे म्हणाले. यावेळी मंचावर माध्यम तज्ज्ञ डॉ. समिरण वाळवेकर, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, अा. राम पाटील रतोळीकर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, माजी आ. अविनाश घाटे, प्रवीण पा चिखलीकर आदी उपस्थित होते.