Home रायगड अतिदुर्गम भागात तारा आदिवासी सामाजिक संस्था देत आहे शिक्षणाचे धडे….

अतिदुर्गम भागात तारा आदिवासी सामाजिक संस्था देत आहे शिक्षणाचे धडे….

159

दिनेश आंबेकर

जव्हार प्रतिनिधी – जव्हार तालुक्यातील अती दुर्गम भाग की ज्यो भाग स्वातंत्र्याच्या 74 वर्षे उलटून देखील ना रस्ता, ना लाईट, ना पाण्याची सुविधा असतेच आरोग्याची समस्या व अनेक अडचणी व विकासापासून आणि मूलभूत सोई सुविधा पासून वंचित आहे ज्या गावात जायला डोंगर दरीं चढ उतार करून पाय वाटेलचा रस्ता काढत चालत गेल्या शिवाय कोणताही पर्याय नसणाऱ्या पिपंळशेत-खरोंडा ग्रामपंचायत मधील हुंबरन हे गाव या गावात तारा आदिवसी सामाजिक संस्था मुलांना देत आहे शिक्षणाचे धडे.

कोरोनाच्या काळात सर्व सामान्य नागरिक अनेक आडी अडचणी वर मात करत आपला उदर्निर्वाह करत जीवनाचा गाडा चालवत आहेत. या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर बाल मनावर व त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झालेला आहे. त्यांच्या अभ्यासात मोठा खंड पडलेला आहे जरी ऑनलाईन शिक्षणाचे धडे मुलांना दिले जात असले तरी तेवढ्या सोई उपलब्ध नसल्याने प्रत्येक्षात शिक्षणाचा पाहिजे तेवढा उपयोग हा ग्रामीण भागातील मुलांना होत नाही त्यातच अती दुर्गम भागाचा तर विचार नकेलेलाच बरा असा भागात मुलांना शाळेची गोडी राहावी मुलांच्या अभ्यासात खंड पडू नये या साठी तारा आदिवासी सामाजिक संस्था मार्फत संस्थापक प्रदीप कामडी यांच्या सहकार्याने व प्रशांत कामडी, हेमंत हिरकुडा, पंकज चौधरी, चेतन साठे यांच्या मदतीने वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करून दीपक रावते या स्थानिक सुशिक्षित तरुणांच्या मदतीने शाळा चालू होत नाहीत तो पर्यत रोज दोन तास मुलांना त्यांच्या बोलीभाषेत मोफत शिक्षण देत आहेत आणि मुलं ही या उपक्रमात तेवढ्याच आनंदाने शिक्षण घेत आहेत या असा अभिनव उपक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे.

प्रदीप कामडी : “शिक्षण आपल्याला अधिक सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनवते. समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षण ही काळाची गरज आहे.”या साठी तारा आदिवासी सामाजिक संस्था प्रयत्नशील आहे…