Home मुंबई राजकीय आरक्षण बंद करा आम्हाला पक्षाचे एजंट नकोत. डॉ. राजन माकणीकर

राजकीय आरक्षण बंद करा आम्हाला पक्षाचे एजंट नकोत. डॉ. राजन माकणीकर

143

मुंबई दि. २२  (प्रतिनिधी) – शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण बंद काय करता दम असेल तर राजकीय आरक्षण बंद करा, आम्हाला या राजकीय आरक्षणाची गरज नाही असे मत डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

डॉ राजन माकणीकर पुढे म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शैक्षणिक आरक्षण बंद करून गरिबांच्या शिक्षणावर गधा आणला आहे तर नोकरीतील आरक्षण बंद करून लाभार्थ्यांना देशोधडीला पोहोचवले आहे. मात्र केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी हिम्मत असेल तर राजकीय आरक्षण बंद करावे अश्या राजकीय पक्ष एजंटपासून समाजाला व लोकशाहीला धोका असल्याचे सांगितले.

आरक्षणावर निवडुंन गेलेले आमदार खासदार हे SC ST OBC ची बाजू घेत नसून संविधान धोक्यात आले आहे, गोर गरीब, दिन दलित, शेतकरी, महिला व मुस्लिमांवर अंन्याय अत्याचार वाढले आहेत तरीही आरक्षणावर निवडून आलेली ही मंडळी काहीच बोलत नाहीत, असे मंडळी लोकप्रतिनिधी नसून त्या-त्या पक्षाच्या एजंटची भूमिका निभावत आहेत यामुळे सर्वप्रथम राजकीय आरक्षण बंद करून स्वतंत्र मतदार संघ देण्यात यावा.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार संघाचे मागणी केली होती मात्र ती मागणी मान्य न होऊन राखीव मतदार संघ निर्माण केले आणि त्यामुळे या राखीव मतदारसंघातून निवडून आलेले आमदार खासदार हे आरक्षित वर्गाचे प्रतिनिधींत्व न करता ज्या पक्षाकडून निवडून आले त्या पक्षाचे एजंट बनून राहतात.

त्यामुळे भारतीय संविधान धोक्यात आले असून लवकरच ही एजंट मंडळी सुधरली नाही तर प्रसंगी जेल मध्ये जाऊ पण सर्वप्रथम आरक्षित जागेतून निवडून आलेल्या आमदार खासदारांना आंबेडकरी जनता धडा शिकवल्याखेरीज राहणार नाही. आणि अश्या आंबेडकरी गटाचे प्रतिनिधित्व पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात आर पी आय डेमोक्रॅटिक करेल असा इशाराही माकणीकर यांनी दिला.