Home जळगाव भुसावळ विभागातील मनमाड स्थानकात अॅपचे उद्घाटन

भुसावळ विभागातील मनमाड स्थानकात अॅपचे उद्घाटन

140

आज भुसावळ मंडळाच्या मनमाड स्थानकावर मध्य रेल्वे चे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या शुभ हस्ते ई कार्मिक आत्मनिर्भरता केंद्र, ई काक आणि एम ए सी पी ॲप चे उद्घाटन करण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळातील सर्व माहिती ह्या केंदाच्या आणि ॲप च्या माध्यमातून मिळू शकते जसे त्यांचा गोपनीय अहवाल, पगार, भविष्य निर्वाह निधी, पदोन्नती, कालावधी नंतर मिळणारी वेतन वाढ, सेवानिवृत्ती लाभ, सुविधा आणि फायदे आदी माहिती एका क्लिक चा साह्याने मिळू शकेल तसे त्यांच्या समस्याचे निवारण देखील ई कार्मिक आत्मनिर्भर केंद्र द्वारे तत्काळ होवू शकेल आणि खऱ्या अर्थाने रेल्वे कर्मचारी आत्मनिर्भर होतील. एम ए सी पी ॲप च्या माध्यमातून विशिष्ठ सेवाकाळ झाल्यावर जी आर्थिक पदोन्नती मिळते ती आता तत्काळ मिळू शकणार आहे. याचा फायदा सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. भुसावळ मंडळाच्या ह्या वैशिषटयपूर्ण उपक्रमाचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी कार्मिक शाखेचे कौतुक आणि अभिनंदन केले आणि दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक घोषित केले. ह्या उद्घाटन प्रसंगी विवेक कुमार गुप्ता डी आर एम, एन डी गांगुर्डे सिनी डी पी ओ, युवराज पाटील सीनि डी सी एम, निशांत त्द्वीवेदी सिनी डी एस टी ई, क्षितिज गुरव मंडळ सुरक्षा आयुक्त, राजेंद्र परदेशी ए पी ओ आणि इतर कार्मिक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.