Home बुलडाणा कारचा अपघात होऊन तरहाला येथील एक महिला ठार

कारचा अपघात होऊन तरहाला येथील एक महिला ठार

366

आसोला फाट्याजवळ जवळ कारला अपघात ,

शेख कौसर ,

मेरा खुर्द प्रतिनिधी
-अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे मेरा खुर्द!जवळील असोला फाट्याजवळ भर धाव वेगाने जात असलेली मारुती सुझुकी सियाज एम्.एच.२८ व्ही.९९१२ क्रमांकाची कार रोडच्या खाली उतरल्याने भिषण अपघात घडला असुन यामध्ये एक महिला जागीच ठार झाली आहे.सदर अपघात हा चिखली देऊळगाव राजा राज्यमहामार्गावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगरुळपीर तालुक्यातील तराळा गावातील रहिवाशी रिकपचंद कोठारी ये त्याच्या मुलीचे लग्न झाल्याने पत्नी,मुलगी व जावाई हे सर्व जण मंगरुळपीर येथुन देऊळगावमही येथील नातेवाईकाकडे येत आसतानां आसोला फाट्याजवळ गाडीचा चालकाने भरधाव व निष्काळजीपणाने गाडी चालवल्याने गाडी वरील नियंञण सुटल्याने गाडी रोडच्या खालील शेतात जाऊन चार पाच पलया मारल्या असुन गाडीतील महिला वंदना रिकपचंद कोठारी यांच्या ङोक्याला जबर मार लागल्याने त्या जागेवर मृत झाल्या.तसेच गाडीतील इतर सर्व जख्मी झाले आहेत.जख्मीना पुढील उपचारासाठी पो.हे.का़ँ.निवृत्ती पोफळे तसेच वाघमारे यांनी तात्काळ जख्मीना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.अशोक फुलचंद कोटेचा रा.देऊळगावमही यांनी गाडीचा चालका विरोधात फिर्याद दिली आसुन अंढेरा पोलीसांनी चालकाविरोधात २७९,३३७,३०४नुसार गुन्हा दाखल केला आसुन पुढील तपास बीट जमदार पो.हे.का़.निवृत्ती पोफळे करीत आहे.

Previous article
Next articleबुलडाणा जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद ,
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.