रायगड

मकरसंक्रांतिचा गोडवा वृद्धाश्रमात थोर आबालवृद्ध समवेत…

Advertisements

गिरीश भोपी

पनवेल , दि. १३ :- नेरे खरा आनंद हा दुसऱ्याला देण्यात असतो . या जन्मीचे सत्कर्म हे आपल्याला पूर्व जन्मीचे पुण्य मिळाले ज्या आई वडिलांच्या कारणे हा जन्म मिळाला ही परंतु शोकांतिका आहे ज्या आई वडिलांच्या नशिबी पुत्रांचे स्नेह नाही .

अश्या वृद्धा श्रमात जाऊन मकरसंक्रांतिचा गोडवा वृद्धाश्रमात थोर आबालवृद्ध समवेत एखादी बॅच जाऊन साजरी करणे ह्या पेक्षा मोठं सुख कोणते असेल हो आज रविवार कोण ना कोण कसले तरी पिकनिक स्पॉट आयोजित करून आपला दिवस घालवीत असतो कोण पार्टी साजरी करून परंतु रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोनच्या एस.एस.सी 1989 च्या बॅच ने आज रविवार असून शांतीवन नेरे ता.पनवेल येथील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमात जाऊन थोर आबालवृद्ध समवेत मकरसंक्रांत तिच्या तीळाचा गोडवा हा सदाबहार कार्यक्रम
वृद्धा श्रमात आनंद देऊन साजरा केला.यात प्रामुख्याने या बॅच चे आपला मित्र आदरणीय रत्नाकर गताडी सर याना श्रद्धांजली देऊन सुरुवात झाली आपल्या मित्राला सर्वांनी श्रद्धांजली दिली तसेच देवेंद्र पाटील , वृषाली आणि राजेंद्र ठाकूर यांनी सुमधुर अशी भाव गीत भक्ती , गीत असा कार्यक्रम झाला सर्व जण संगीताने मंत्रमुग्ध झाले खरंच या बॅच ने अश्या प्रकारचा कार्यक्रम सलग तिसऱ्या वर्षी केला खरंच आणि ती अवतीभवती ची परिस्थिती पाहून बॅच चे विद्यार्थी भावना विवंश झाले जगण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या ला देण्यात असतो 1989 च्या बॅचची सामाजिक बांधिलकी जपण्याचा हेतूने आणि सामाजिक स्तरावर कार्यक्रम करण्याची जी मनात आवड आहे ती सतत दिसून येत असते अश्या प्रकारे s s c बॅच 1989 ने नेरे शांतिवंन येथे मकरसंक्रांत चा गोडवा साजरा केला.

या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक श्री.विद्याधर पाटील यांनी केले तर उत्कृष्ट निवेदन श्रीमती समता ठाकूर यांनी केले.या निमित्ताने सुयश क्लास आवरेचे संचालक निवास गावंड,मनोज पाटील तसेच सेवा निवृत्त भारतीय जवान संतोष ठाकूर आदींनी आपली उपस्थिती दर्शवून आनंद द्विगुणित केला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वृद्धाश्रमाचे कार्यकारी अधिकारी नंदकुमार उरणकर,मित्र परिवारातील कृष्णा पाटील,सुभाष म्हात्रे,कांचन थळी, कांचन म्हात्रे, संतोष पाटील, शामकांत पाटील, लक्ष्मीकांत म्हात्रे, प्रवीण गावंड , विनोद ठाकूर शेखर म्हात्रे, दिलिप थळी आदींनी सहकार्य केले.

You may also like

रायगड

यू-टयूब चॅनल्स अधिकृत प्रसारमाध्यम नसून केवळ सोशल मिडीया प्लॅटफॉर्म

अलिबाग , जि. रायगड,दि.13 (जिमाका):- काही व्यक्ती अनधिकृतपणे वृत्तपत्रे प्रकाशित करतात व सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ...
रायगड

हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशी द्या , “शेकाप नेते पंडीत पाटील यांची मागणी”

श्रीवर्धन तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन….!   उदय वि कळस  –  श्रीवर्धन  उत्तरप्रदेशातील हाथरस येथील सामूहिक ...
रायगड

रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू

गिरिश भोपी –  रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा कार्यभार श्री.जयसिंग दत्तात्रय मेहेत्रे यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव ...
रायगड

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गिरीश भोपी अलिबाग / रायगड , दि.29  – ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख ...
रायगड

पनवेल डी.डी. विसपुते बी.एड.महाविद्यालयात “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस उत्साहात संपन्न”

अलिबाग – आदर्श शैक्षणिक समूहाचे, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल व बोर्ड ...