Home मराठवाडा घाटी रुग्णालयात तोडफोड सुरक्षा रक्षकांना मारहाण

घाटी रुग्णालयात तोडफोड सुरक्षा रक्षकांना मारहाण

38
0

गुन्हा दाखल…

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १३ :- येथील घाटी रुग्णालयात आज एक रुगनाचा मृत्यू झाल्या मुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात मोठया प्रमाणात धुडघुस घालून तोडफोड केली व हल्ला चढवला या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक ही जखमी झाले आहेत .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार लोटा कारंजा येथील एक ४० वर्षीय रुग्ण येथील घाटी रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आला होता येथील डॉक्टरने आधीच रुग्ण गंभीर असल्याचे सांगितले होते तरी ही नातेवाईकांच्या आग्रहामुळे त्या रुग्णास दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना तो रुग्ण दगावला यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी येथील आय सी यु विभाग , नर्सिग रम , निवासी डॉक्टर कक्ष आणि प्रवेशद्वार च्या काचा फोडल्या हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांना ही मारहाण करण्यात आली व नातेवाईकांनी केलेल्या या हल्ल्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांच्यात दहशत निर्माण झाली होती असे माहिती देताना डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .

Unlimited Reseller Hosting