
साखरखेर्डा तालुका केव्हा होणार साहेब ,
साखरखेर्डा तालुका निर्मीतीचा प्रस्ताव शासनदरबारी नाहीच.
नेत्यांनी दिली साखरखेर्डा वासीयांना खोटी आश्वासने.
माहिती अधिकारात उघड
अमीन शाह
बुलडाणा ,
साखरखेर्डा तालुका व्हावा हा मुद्दा गेल्या अनेक वर्षा पासून उपस्थित केला जात आहे विधानसभा लोकसभा निवडणूक जवळ आली की हा मुद्दा उपस्थित केला जातो मात्र निवडणूक पार पडल्यानंतर सत्ताधारी हा मुद्दा विसरून जातात अलीकडेच साखरखेर्डा येथील प्रसिध्द माहिती अधिकार कार्यकर्ता गोपाल रामसिंग शिराळे यांनी शासनास माहिती अधिकार अर्ज देऊन साखरखेर्डा तालुक्या संदर्भात विचारणा केली असता आमच्या कडे आज पर्यंत नवीन साखरखेर्डा तालुक्याचा प्रस्ताव आला नसल्याचे उत्तर मिळाले आहे
सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा हा गाव खुप मोठा गाव असुन महाराष्ट्रातील सगळयात मोठी दोन नंबरची ग्रामपंचायत येथे अस्तीत्वात आहे. व हे गाव तालुक्यापासुन 55 किमी अंतरावर असुन सिंदखेडराजाला जाण्या येण्यासाठी लोकांना तारेवरची कसरत करावी लागते तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी फक्त दोनच एस टी गाडया आहे. त्याही कधी चालु तर कधि बंद असतात, सकाळी जाऊन संध्याकळ पर्यंत काम होईल अशि अपेक्षाही नसते. परत येतांना शेवटची गाडी सुटली कि रात्र येथेच काढावी लागते, किंबहुना खाजगी गाडयांचा जास्तीत जास्त वापर करावा लागतो गरीब कास्तकार, शेतकरींना सर्व दिवसांचे कामकाज सोडुन महसुल व पंचायत समिती कोर्टा च्या कामकाजासाठी येथील नागरिकांना तालुक्याला जावच लागत
सिंदखेडराजा तालुक्याचे विभाजन करुन साखरखेर्डा या गावास तालुका निर्मीती करण्याचे अनेक आश्वासने लोकप्रतिनीधी केवळ निवडणूक आली की देतात व मते घेऊन मोकळे होतात सते वर आले की विसरतात
साखरखेर्डा हे तालुका होणार का ? जाणुन घेण्यासाठी गोपाल शिराळे यांनी महसुली मंत्री यांना थेट माहिती अधिकार अर्ज पाठवुन साखरखेर्डा गाव सिंदखेडराजा तालुक्यातुन विभाजन करुन तालुका निर्माण करण्याचा शासनाकडील प्रस्ताव देण्यात यावा व सदर गाव हे तालुका कधि होणार याची माहिती देण्यात यावी असे दोन प्रश्न शासनास केल्यानंतर, अनुष्का दळवि, जनमाहिती अधिकारी तथा कार्यासन अधिकारी महसुल व वनविभाग , महाराष्ट्र
शासन ,मंत्रालय मुंबई यांनी कळविले कि, सिंदखेडराजा तालुक्याचे विभाजन करुन नवीन साखरखेर्डा तालुका निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेला नाही. अखेर साखर खेर्डा तालुका केव्हा होणार असा प्रश्न साखर खेर्डा वासीयांना पळला आहे ,
मंत्री महोदय काही तरी करा हो , ?
मंत्री महोदय साखरखेर्डा तालुका व्हावा असा आश्वासन आपण अनेकदा दिलेला आहे , तालुका फार लांब असल्या मुळे आमचे हाल होत आहे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला तारेवरची कसरत करावी लागत आहे आमचे होणारे हाल पाहता आपण प्रसतावीत साखरखेर्डा तालुक्या चा प्रस्ताव शासनास देऊन प्रयत्न करावा अशी मांगणी परिसरातील असंख्य लोक करीत आहे ,











































