Home बुलडाणा नुकसान ग्रस्त यादीतून चिखली तालुका का वगळण्यात आला?

नुकसान ग्रस्त यादीतून चिखली तालुका का वगळण्यात आला?

308
0

 

शह कट शहाच्या राजकारणाने चिखली तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर

अतिवृष्टीच्या आर्थिक मदतीपासून चिखली तालुक्यातील शेतकरी वंचीत

 

अमीन शाह

चिखली : राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्हा भरतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून बाधित पिकांसाठी १० हजार तर फळ पिकांसाठी २५ हजार रुपयांची हेक्टरी मदत दिली जाणार असून जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील ५९४०१ शेतकऱ्यांना,मेहकर तालुक्यातील १७०१ शेतकऱ्यांना ,दे राजा तालुक्यातील १०७१ शेतकऱ्यांना,खांमगाव तालुक्यातील १९१५ शेतकऱ्यांना तर बुलढाणा तालुक्यातील ३३२ शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई पोटी आर्थिक मदत मिळणार असल्याने जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे ,
सिंदखेड राजा मतदार संघात या संदर्भात फारसी मागणी नसतांना देखील या मतदार संघाचे विध्यमान आमदार राज्य शासनात मंत्री असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री शिंगणे साहेब व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याने माजी आमदार खेडेकर साहेब या दोन्ही प्रतिनिधींही आपल्या मतदार संघातील शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान मुख्यमंत्री यांच्याकडे सततच्या पाठपुराव्यामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील जास्तीत जास्त जास्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यात ते यशस्वी झाले, तेच इतर तालुक्यात मात्र फक्त प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधा वर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देणे व फोटो शेषन करून वर्तमान पत्रात मोठं मोठ्या बातम्या लावण्यापुरतेच मर्यादित राहीले की काय असे दिसत आहे,
चिखली तालुक्यात ही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून बहुतांश संघटनांनी व आजी,माजी आमदारांनी देखील नुकसान भरपाईची मागणी शासन दरबारी केलेली आहे, परंतु त्याचा सतत पाठपुरावा करण्याचे काम हे लोकप्रतिनिधीचे असते चिखली मतदार संघातील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्यास कुठे कमी पडले याचे आत्मपरीक्षण करणे त्यांच्या साठी गरजेचे असणार आहे विध्यमान आमदार महाले तर सतत प्रसारमाध्यमांद्वारे शेतकऱ्यांच्या सँम्पर्कात दिसतात व मंत्रिमंडळात ही आवर्जून उपस्थित असतात परंतु त्या ही पाठपुराव्यात कमी पडल्यात का? व राज्य शासनात बऱ्यापैकी वजन असलेले माजी आमदार सत्तेतील पक्षातील जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांची ही पकड राज्य शासनावर आमदाराप्रमाणेच असून देखील ते ही कुठे कमी पडले हे देखील कळेनासे झाले असून तालुक्यातील आजी, माजी आमदार दोघे ही अभ्यासू असून इतर गोष्टीच्या पाठपुराव्यात अग्रेसर असणारे मात्र इथे शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यास का व कुठे कमी पडले ,आजी माजी लोकप्रतिनिधी दोन्ही ही सक्षम नेतृत्व असतांना देखील चिखली तालुक्यातील शेतकरी आर्थिक मदती पासून वंचीत का? हाच प्रश्न सर्व सामान्य शेतकऱ्यांना पडत असून दोघांनी ही शह कट शहाचे राजकारण सोडून शेतकरी हितासाठी आपली सँम्पूर्ण ताकद शासन दरबारी खर्च करावी अशी मागणी शेतकरी संघर्ष चळवळीतील कार्यकर्त्यांसह मतदार संघातील शेतकऱ्यांची असल्याचे प्रशांत ढोरे पाटील यांनी सांगितले.