Home बुलडाणा पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद  घडल्यास समस्या दूर होतात :अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग...

पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद  घडल्यास समस्या दूर होतात :अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे

241


मातृतीर्थातुनच मिळाली होती गोड बातमी ,

 

देऊळगावराजा प्रतिनिधी

_पोलीस म्हटलं की भल्या भल्यांचे मखरं गळायला लागतात.पोलीसांच्या बर्‍या-वाईट कारकीर्दीला समाज तशी सहजासहजी दाद देत नाही. पोलीसांचे कितीही चांगले कार्य असले आणि धडाकेबाज कारवाया केल्या तरी देखील त्यावर सकारात्मक, नकारात्मक प्रतिक्रिया ह्या उमटायला लागतातच. तरी देखील हिम्मत न हारता समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी विविध संकटकाळात पोलीस देवदूत म्हणून जेव्हा जेव्हा धावून येतो तेव्हा तेव्हा पोलीस आणि जनतेचा स्नेह दांडगा होतो. पोलीसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. त्यामुळे पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद घडल्यास समस्या दूर होतात असं मतं नव्याने अप्पर पोलीस अधीक्षक पदी रूजू झालेले बजरंग बनसोडे यांनी देऊळगाव राजा येथे बोलताना सांगितले.
कोरोनाच्या टाळेबंदीत अख्खा देशाने सगळी माणसं गृहवासात बंदिस्त असताना अहोरात्र मात्र रस्त्यावर पोलीसच दिसत होता. करोनासारख्या संसर्गजन्य विषाणूच्या बाबतीत डॉक्टर आणि आरोग्यसेवकांच्या जीविताला धोका सर्वाधिक. साथरोग नियंत्रण कायद्याच्या कार्यकक्षेतील हा विषय असल्यामुळे विलगीकरण, टाळेबंदी, संचारबंदी, जमावबंदी अशा उपायांच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलीस यंत्रणेवरच. त्यामुळे पोलिसांसह कित्येक डॉक्टर, आरोग्यसेवक, देशभर करोनाबाधित झाले आहेत. यंत्रणेवरील ताणामुळे जिवाला मुकणे हा वैद्यकीय आणि पोलीस अशा दोन्ही व्यवसायांचा एक स्वा त्यामुळे प्रत्येकांच्या मनात पोलीसांविषयी आदराची भावना व्यक्त होत आहे.

मातृतीर्थातुनच मिळाली होती गोड बातमी ,

नावातच बजरंग असल्याने व पोलिसीखात्यात देखील बजरंगी नावाचं अस्त्र असल्याने ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली त्या त्या ठिकाणी गुन्हेगाराना सळो की पळो करून सोडणारे  बजरंग बनसोडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केले घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना घरात कुणालाच शिक्षणाचा गंध नसल्यामुळे सुरुवातीला शिक्षकी पेशा स्वीकारून नंतर पदवी शिक्षण पूर्ण केले त्यानंतर विविध स्पर्धा परीक्षा ची तयारी केली यामध्ये एकाच वेळी अनेक परीक्षेमध्ये यश मिळाले. मात्र मातृतीर्थ देऊळगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये शिकाऊ  पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्य करत असतानाचं  नगरपालिका मुख्याधिकारी हजर होण्याची व पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाल्याची गोड बातमी या ठिकाणीच मिळाली. त्यानंतर  मिरज (सांगली) , अहमदनगर, नाशिक, मुबंई या ठिकाणी काम करताना वाढती गुन्हेगारी मोडीत काढली. सध्याच्या काळात लाठीपेक्षा कलमने आरोपींना जास्त वठणीवर आणता येऊ शकते यावर त्यांचा विश्वास आहे.
जातीयवादाच्या धगधगत्या अग्निकुंडात भडकत जाणाऱ्या मेंदूला जागृत जाणीव करून देतानाच गरज आहे तेथे सक्षमपणे बळाचा वापर करतात यामुळेच त्यांची “कर्तव्यकठोर अधिकारी”  म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील कारकीर्द गाजली. कान्याकोपऱ्यातील विविध सामाजिक गटाचे ऐक्य घडवून नगर शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त सार्वत्रिक एकच मिरवणूक काढण्याचा त्यांनी अभिनव प्रयोग यशस्वी केला. मानव हा एकच धर्म असल्याची जाणीव करून दिली. सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्यक्रमांसाठी व उत्सवांसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची गरज पडणे हे सामाजिक सुज्ञपणाचे लक्षण नाही असे त्यांचे मत आहे. मुळातच कोणतेही धार्मिक रिवाज हे संस्कारांचे दृढीकरण करण्यासाठी केले जातात.  जर त्यासाठीच पोलीस बंदोबस्ताची गरज पडू लागली तर गुन्हेगार, आरोपी यांच्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ उपलब्ध राहणार नाही.  बजरंग बनसोडे यांचा तसा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, साहित्यिक या क्षेत्राचा प्रगाढ अभ्यास असल्याने करिअरच्या वाटा चोखाळणाऱ्या तरुणांना जीवनात यशस्वी कसे व्हावे? याचेही तत्वज्ञान सांगितले. विद्यार्थी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, शिक्षक, समाज, संस्था यांनी जागृतता बाळगावी तर निकोप समाज निर्माण होण्यास मदत होईल. तरुण वर्गातील व्यसनाधीनता ही सामाजिक प्रगतीतील सर्वात मोठी खिळ आहे त्यातूनच  विकृत गुन्ह्यांची ऊपज होते.  व्यासनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नरत संस्थाना सहकार्य,  गांवात जाऊन जनजागृती केली. महिला अत्याचाराच्या घटना सबंध देशात डोकं वर काढायला लागल्या तेव्हा यावर पायबंद घालण्यासाठी ‘निर्भया’ या कार्यक्रमाअंतर्गत महिलांना, शाळकरी मुलींचा उत्साह वाढवून नारी शक्तीला अत्याचारांविरोधात लढण्याची ताकद निर्माण केली. संस्काराची व नियंत्रणाची खरी सुरुवात घरापासूनच होते, तेव्हा मुलींना सक्षम बनवताना मुलांवरही नियंत्रण व संस्कार तेवढ्याच कठोरपणे करण्याची गरज आहे असे ते सांगतात. परिणामी महिला अत्याचारांच्या घटनांना लगाम बसेल.
दंगलीच्या घटनामुळे कलंकित झालेल्या मिरज सारख्या संवेदनशील शहरांमध्ये “पोलीस बंदोबस्ताशिवाय गणपती उत्सव” ही संकल्पना रुजवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे परस्पर द्वेषभाव आटोक्यात येवून हिंदू – मुसलमान आनंदाने एकत्र नांदायला लागले.  सामाजिक कार्य करतानाच आवश्यकता भासल्यास अत्यंत कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी केली. तसेच गुन्हेगारी जगतावर तेवढ्याच प्रभाविपणे कारवाया करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बळ दिलं.
बुलढाणा जिल्ह्यात पायाभूत पोलिसिंग करताना कायद्याचा धाक गैरवर्तन करणार्‍यांच्या मनात निर्माण होईल;  पीडित, सर्वसामान्यांना पोलिस आपलेसे व मित्र वाटतील यावर भर देण्याचा त्यांचा मानस आहे.