Home बुलडाणा त्या तरुणीचा खून करून फरार झालेल्या संशयितास  अटक ,

त्या तरुणीचा खून करून फरार झालेल्या संशयितास  अटक ,

377

 

साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी ,

31 पर्यंत पोलीस कोठडी ,

अमीन शाह ,

बुलडाणा , साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रान अंत्री या गावी एका तरुणी चा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता या खून प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी जेजुरी येथून आरोपीस अटक केली आहेत ,

या संदर्भात पोलिस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार रानअंत्रि येथील सुजाता खरात ही गेल्या काही दिवसा पासून गायब होती या प्रकरणी त्याचे वडील समाधान खरात यांनी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती त्याच दिवशी गावातील काही महिलांना कपाशी च्या शेतात एक प्रेत कुजलेल्या अवस्थेत सापडला होता या प्रकरणी पोलिसांनी भा , द , वि , 302 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता , मिळालेल्या माहिती नुसार मृतक तरुणीच्या बहिणी ने सांगितले की माझी बहिण गावातील भीमराव खिल्लारे 30 याच्या जवळून विकलेल्या मोबाईल चा सिम कार्ड घेऊन येते असे म्हणून गेली होती ती परत आलीच नाही या माहिती वरून पोलिसांनी फरार झलेल्या भीमराव इंगळे याचा शोध घेतला असता त्याच्या मोबाईल लोकेशन वरून तो जेजुरी पुणे येथे असल्याचे समजले या आरोपीस अटक करण्यासाठी ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो , उपनिरीक्षक दीपक राणे , पो , हे , का , नारायण गीते , पो , का , विशाल बनकर , पो , का , राजेश मापारी , यांनी संशयित आरोपीस अटक करून साखरखेर्डा येथे आणले , या आरोपीस आज न्यायल्या समोर उभे केले असता त्यास 31 पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे ,