Home परभणी मिस कॉल करो आंदोलनास शिवअहिल्या शासन संघटनेचा पाठिंबा

मिस कॉल करो आंदोलनास शिवअहिल्या शासन संघटनेचा पाठिंबा

263

प्रतिनिधी

आरक्षण अंमलबजावणी चा लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या मिस कॉल करो आंदोलनास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शिव आहिल्या शासन संघटनेच्या वतीने जाहीर प्रसिद्धीपत्रक काढून या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला.

धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची हाक देण्यात आली. धनगर साम्राज्य सेनेचे प्रदेश विभागीय पदाधिकारी व जिल्हास्तर व तालुकास्तरावरील कार्यकर्ते हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.एकूणच पहिल्याच दिवशी या आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला. शिव अहिल्या शासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश पांढरे यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष दिलीप काटकर, युवा अद्याक्षनिशिकांत गोरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. विविध सामाजिक संघटना कडून मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याने सात दिवस चालणार आंदोलन राज्यकर्त्यांच्या मनात धडकी भरवेल असा विश्वास धनगर साम्राज्य सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकळ यांनी व्यक्त केला.