Home विदर्भ पुसद येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यां करिता पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण विशेष कार्यशाळा संपन्न

पुसद येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यां करिता पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण विशेष कार्यशाळा संपन्न

140

यवतमाळ / पुसद –  राज्यात अल्पसंख्याक समाजाचे पोलिस सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता पुसद जिल्हा यवतमाळ येथील प्रा.सलमान सरांच्या शिक्षा स्पर्धा परीक्षा केंद्रा तर्फे आगामी पोलिस भर्ती 2020 करिता मोफत पुसद यथे पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोइनोद्दीन इकबाल सर तर प्रमुख मार्गदर्शक मा.आसिफ इक्बाल सर यांनी केले.

या कार्यशाळेत आगामी पोलिस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षे बद्दल योग्य मागदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. सलमान सय्यद सरांनी केले. तसेच शिक्षा स्पर्धा परीक्षाकेंद्र हे सर्व समाजातील विद्यार्थ्या करिता मोफत मार्गदर्शन केंद्र आहे.यामुळे पुसद मध्ये स्पर्धा परिक्षे साठी जनजागृती होईल आणि सर्वांना याचा फायदा होईल याच उद्देशाने प्रा.सलमान सरांनी हे केंद्र सुरू केले आहे सर्व मंडळींनी या केंद्राचा लाभ घ्यावे असे आवाहन प्रा.सलमान सरांनी यांनी केले.