Home विदर्भ मार्क कोचिंग क्लासेस यवतमाळच्या वतीने कसोटी मालिका पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

मार्क कोचिंग क्लासेस यवतमाळच्या वतीने कसोटी मालिका पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

77
0

यवतमाळ , ( वासीक शेख ) –  गेल्या शनिवारी मार्क कोचिंग क्लासेसच्या वतीने पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.परीक्षा, भाषण स्पर्धा अशा विविध क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री.परवेज़ सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मुज़म्मिल सर आणि समिउल्ला खान सर या प्रामुख्याने उपस्थित होते.

पारितोषिक सोहळ्याची सुरुवात तिलवत ए कुरआन पाक ने झाली.त्यानंतर लगेच पुरस्कार वितरण झाले.मुख्य अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी संबंधित क्षेत्रातील विजेत्यांना बक्षिसे वितरीत केली.त्यांनी खूप प्रेरणादायी भाषण केले.निश्चित विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी त्यांनी आयुष्यात अधिक परिश्रम करण्याचा सल्ला दिला.विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी एक-दोन घटना ही सांगितल्या. यावेळी मुख्तार सर
संचालक (मार्क कोचिंग क्लासेस) फैझान अहमद सर सह-संचालक (मार्क कोचिंग क्लासेस) उपस्थित होते.