Home पश्चिम महाराष्ट्र अशोकराव आव्हाळे यांचा स्मितसेवा फाऊंडेशन हडपसर यांच्या वतीने‌ सत्कार 

अशोकराव आव्हाळे यांचा स्मितसेवा फाऊंडेशन हडपसर यांच्या वतीने‌ सत्कार 

110
0

आज दि. 11/10/2020 रोजी अशोकराव आव्हाळे सांचा स्मितसेवा फाऊंडेशन हडपसर यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणुन सन्मान करण्यात आला. या संस्थेच्या अध्यक्ष सौ स्मिताताई गायकवाड यांचे वतीने पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका उज्वलाताई जंगले, हडपसर विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे अध्यक्ष संदीप दळवी यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश घुले, जनसेवा बॅंकेचे संचालक रविभाऊ तुपे, हडपसर मतदार संघाचे मा अध्यक्ष सुभाष जंगले, अरुणदादा बेल्हेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश बेल्हेकर, फाऊंडेशनच्या दर्शनाताई भुजबळ, प्रेम सलगर इ. अनेक मान्यवर उपस्थित होते.