Home जळगाव आमदार अनिल पाटील व जिल्हाधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियानाचा शुभारंभ… विविध...

आमदार अनिल पाटील व जिल्हाधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियानाचा शुभारंभ… विविध दाखल्यांचे वाटप करून लाभार्थ्यांना शासकीय अनुदानातून हरभरा बियाणे देखील वाटप …

75
0

रजनीकांत पाटील

अमळनेर – येऊन एकाच छताखाली सर्व कागदपत्रे उपलब्ध झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून शासनेने महाराजस्व अभियान योजनेची समाधान योजना ग्रामीण भागात सुरू केली आहे. त्यात असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी नगाव खुर्द येथे केले.

नगाव खु येथे शनिवारी दुपारी तालुक्यात आयोजित महाराजस्व अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी सीमा अहिरे, डीवायएसपी राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दीपक पोटोडे, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, पालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, सरपंच प्रेरणा बोरसे, उपसरपंच कोकिळाबाई गोसावी, सरपंच महेश पाटील, माजी सरपंच प्रा.तुषार पाटील, प्रविणगीर गोसावी, केशव पाटील, काशिनाथ दयाराम पाटील, रोहित पाटील, छोटु प्रल्हाद पाटील, संतोष आत्माराम पाटील, उत्तम शेनपडू पाटील, महिला बचत गटाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व महिला सदस्य आदी यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले स्वस्त धान्य कार्ड, देण्यात आली. तर संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर शासकीय अनुदानातून हरभरा बियाणे देखील वाटप करण्यात आले. शासनाने 1 एप्रिल पासून या अभियानाचा शुभारंभ केला मात्र कोरोनामुळे अभियानाचा शुभारंभ केला गेला नाही आता मात्र अभियान सुरू करण्यात आले असुन महाराजस्व अभियानात तहसीलदार प्रांत कमतरता वाटेल अशा गोष्टी बारकाईने अभ्यास करा. विविध घटकांना 25 ते 27 योजनांचा लाभ द्या. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यासाठी संजय निराधार कमिटी स्थापना करून द्यावी जेणेकरून दोन अडीच हजार प्रकरणे साचले आहेत त्यांचा निपटारा करण्यात येईल त्यासाठी समिती गठीत करा व त्वरित मान्यता द्यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. समस्या जागीच सोडविण्याचा प्रयत्न असेल माहिती घ्यावी कागदपत्रांची झेरॉक्स जोडा,चकरा कमी होतील यासाठी कागदपत्रे आणि लाभ दुसऱ्या कॅम्प जास्तीत जास्त कसा होईल याबाबत आपण दक्षता घेणार आहोत असे आमदार पाटील म्हणाले तर यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यावेळी म्हणाले की कोरोनासारख्या इतक्या गंभीर परिस्थितीत देखील आपण कॅम्प घेतला सुरुवात चांगली केली. आता तालुक्याची एकच जबाबदारी आहे यात तालुका एक नंबरवर ठेवा, बिनशेती परवानग्या, शर्त भंग असे इतर कार्यक्रम आपण घेऊ शकतो. गावांनी यातून विविध अभियान राबवा सध्या वृक्षारोपण अभियानाच्या कामाच्या मान्यता प्रत जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते देण्यात आल्या त्यात वृक्षारोपण करून पुढचे तीन वर्षे जगवा व सर्व गावकरी उत्साहाने सहभागी व्हा. गावात लोकाभिमुख प्रशासन राबवता येईल यासाठी सहकार्य करा असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी ग्रामस्थांना केले.