Home विदर्भ आलेगाव येथे प्राण्यांवर लम्पी रोगाचा प्रकोप , “लस सह डॉक्टर उपलब्ध नाही”

आलेगाव येथे प्राण्यांवर लम्पी रोगाचा प्रकोप , “लस सह डॉक्टर उपलब्ध नाही”

72
0

अकोला – पातुर तालुक्यातील आलेगाव येथे प्राण्यांवर लम्पी आजाराचा प्रकोप वाढला असून आलेगाव पशु रुग्णालयात लस उपलब्ध नाही. पातुर तालुक्यातील सगळ्या मोठा गावं आलेगाव हे असून येथे अधिकतर शेतकरी वर्गाचे नागरिक राहतात. सततची नापिकी व आर्थिक संकटात सापळलेल्या शेतकरी आपली घरगुती सुरळीतपणे चलण्या करिता दुधाळ प्राणी पाळतात , दरवर्षी पावसाळ्यात प्राण्यांवर अनेक आजार पसरतात परंतु मागील कित्येक महिन्यापासून आलेगाव पशु रुग्णालयात डॉक्टर अभावी आलेगाव येथी शेतकऱ्याचे अनेक शेळ्या गायी भेशीं दगवल्याने येथील शेकऱ्यांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन कराव्यालागत आहे. सद्या आलेगाव पशु रुग्णालयात लम्पी आजार लसीकरणा साठी 1000 लस आली होती ज्या मधून 100 लसी आलेगाव इथल्या प्राण्यांना टोचण्यात आली व बाकी आलेगाव परिसरातील गावात देण्यात आली अशी माहिती आलेगाव पशु रुग्णालयात असणारे कर्मचरांनी दिली. सद्या आलेगाव येथील प्राण्यांवर लम्पी आजाराचा प्रभाव झपाट्याने वाढत चालला आहे तरी संबंधीत विभागाने या कळे विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर आलेगाव पशु रुग्णालयात डॉक्टर व लसीचा प्रबंध करण्याची नागरिकांची मागणी आहे.