Home मराठवाडा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे...

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

183
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना – मागील पंधरवड्यात तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झालेले असुन शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीन,तूर व कापुस हि नगदी पिकं अतिरिक्त पावसामुळे उद्धवस्त झालेले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला असुन चिंताग्रस्त झालेला आहे. तरी महसुल प्रशासनाने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्या स्तरावरुन पंचनामे करण्याचे आदेश देवुन प्रती हेक्टरी ५०,०००/- रु. आर्थिक मदत देण्याबाबत कार्यवाही करुन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी युवा सेनेच्या वतीने घनसावंगीचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात नमूद केले आहे की, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी या बाबतीत वरीष्ठ कार्यालयास कळविण्यात यावे तसेच मा. मुख्यमंत्री कार्यालयात सदर प्रकरण कळविण्यात यावे . यावेळी उपस्थित युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश काळे,संतोष जाधव,रवी शिंदे,धर्मराज आंधळे,माऊली उंबरे,हरिभाऊ शिंदे उपस्थित होते.