Home बुलडाणा शेतकऱ्यांना सरसगट तात्काळ मदत जाहीर करा , मदनराजे गायकवाड ,

शेतकऱ्यांना सरसगट तात्काळ मदत जाहीर करा , मदनराजे गायकवाड ,

88
0

शेतकऱ्यांना सरसगट तात्काळ मदत जाहीर करा , मदनराजे गायकवाड ,

हनिफ शेख

देऊळगावराजा तालुक्यात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडला पडलेल्या पाऊसा मूळे अनेक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले
असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरसगट मदत करावी या साठी तहसीलदार सारिका भगत यांच्या मार्फत शासनास निवेदन देण्यात आले ,

जिल्हा अध्यक्ष मदनराजे गायकवाड़ यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय देऊळगांव राजा येथे निवेदन देण्यात आले सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 30 हजार प्रमाणे मदत देण्यात यावी शासनाने पंचनामा न करता त्वरित हेक्टरी ३०,००० रुपये प्रमाने मदत देण्यात यावी या वेळी
बुलडाणा जिल्हा अध्यक्ष मदनराजे गायकवाड़ मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळराजे देशमुख, तालुका अध्यक्ष राजू मांटे,शहर अध्यक्ष शेख कदीर,,जेष्ठ नेते शेख शहजाद भाई, तालुका उपाध्यक्ष विजयराज भागिले, देवा डीघोळे, प्रकाश बस्सी, दत्ता जावळे,शहर उपाध्यक्ष नवनाथ रामाने, बालाजी खांडेभराड, बंडू पाटिल डोळस आदी मनसेचे कार्यकर्ते हजर होते.