Home पश्चिम महाराष्ट्र लाडक्या जावयावर धोंड्या ऐवजी दांडे खाण्याची पाळी ???

लाडक्या जावयावर धोंड्या ऐवजी दांडे खाण्याची पाळी ???

407
0

 

 

पोलिसांनी केला पाहुणचार ,

अमीन शाह ,

 

नेवासे : धोंड्याचा महिना जावयासाठी पर्वणी , तर सासरच्या मंडळीची कसोटी पाहणारा असतो . अनेकदा भेटवस्तुच्या देण्याघेण्यावरुन वादही समोर येतात . मात्र गोगलगाव ( ता . नेवासे ) येथे आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला ‘ धोंड्या ‘ ऐवजी ‘ दांडे ‘ खाण्याची वेळ आली .असा पाहुणचार झाल्याने वैतागलेल्या जावयाने थेट नेवासे पोलीस ठाणे गाठले . आणि तेथेच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार ( ता . २७ ) रोजी घडली . तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला . पण , या कृत्यामुळे सासुरवाडीऐवजी ‘ पोलीस कोठडी’त मुक्काम करण्याची वेळ त्याच्यावर आली . गणपत दगडू पवार ( वय ३५ , राहणार शिर्डी , ता . राहाता ) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘ जावई बापू’चे नाव आहे . या बाबत माहिती अशी , गणपत पवार याने शनिवारी ( ता . २६ ) रोजी त्याच्या पत्नीला तिच्या माहेरी ( रा . गोगलगाव , ता . नेवासे ) सोडले आणि दुसऱ्याच दिवशी रविवारी ( ता . २७ ) रोजी तिला बरोबर घेऊन जाण्यासाठी पुन्हा सासरवाडीला आला . मात्र , सासरच्या मंडळीने मुलीला त्याच्याबरोबर पाठवण्यास नकार दिला . संतापलेल्या पवारने रागाचे भरात रविवारी त्याच्या दुचाकीवर ( एम.एच १७ बी.डब्यु ०११४ ) नेवासे पोलीस ठाण्याच्या मुख्य गेटसमोर आला . त्याने दुचाकी स्टँडला लावून अचानक डिक्कीतून पेट्रोलची बाटली काढून अंगावर ओतून घेतली . हा प्रकार वायरलेस कर्तव्यास असलेले पोलीस शिपाई सतीश देसाई यांनी पाहिला . त्यांनी तात्काळ त्याच्या हातातील पेट्रोल बाटली हिसकावून त्याला ताब्यात घेतली . यावेळी पवार याने सासरची मंडळी माझ्या पत्नीला माझ्याबरोबर पाठवत नाही म्हणून आपण असे कृत्य केल्याचा जबाब दिला आहे . पोलीस शिपाई सतीश देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणपत पवार यांच्या विरोधात नेवासे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्याला अटक करण्यात आली आहे .

बातमी सोबत दिलेला फोटो काल्पनिक चित्र आहे ,