Home विदर्भ कुख्यात गुन्हेगाराकडून पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त , ‘टोळी विरोधी पथकाची कारवाई”

कुख्यात गुन्हेगाराकडून पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त , ‘टोळी विरोधी पथकाची कारवाई”

502
रवि माळवी
यवतमाळ –  मोक्का खटल्यात जामिनावर बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगारांजवळून टोळी विरोधी पथकाने एक पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केली. टोळी विरोधी पथकाने ही कारवाई दिनांक २८ सप्टेंबर रोजी आयटीआय कॉलेज जवळ बाभुळगांव येथे दुपारी १.१५ वाजताचे सुमारास केली.
    अनिकेत गावंडे (२५) रा.बाभुळगांव असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील कार्यरत टोळी विरोधी पथकाचे प्रमुख मिनल कोयल, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या  गोपनीय माहितीवरुन बाभूळगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा व मोक्का अपराध खटल्यामध्ये जामिनावर बाहेर आलेला कुख्यात गुन्हेगार अनिकेत विलासराव गावंडे (२५) रा.बाभुळगांव यास आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी आयटीआय कॉलेज जवळ बाभुळगांव येथे दुपारी १.१५ वाजताचे सुमारास शोध घेवून त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक पिस्तोल किंमत ५० हजार रुपयाचे व दोन जिवंत काडतूस २ हजार रुपये किंमतीचे अंदाजे एकुण ५२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
    आरोपी अनिकेत गावंडे याचेवर यवतमाळ शहर पोलीस स्टेशन मध्ये अप. क्र. ३९३/२०१६ भादंवि कलम ३०७ आर्म अॅक्ट ३/२५, ४/२५, यवतमाळ शहर पोलीस स्टेशन अप. क्र. ४३७/२०१७ कलम ३०७, ३९७ आर्म अॅक्ट ३/२५, ४/२५ , नेर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. १९२/२०१६ भादंवि ३९९, ४०२ नुसार गुन्हे दाखल आहे.
    आरोपीवर वेळोवेळी टोळी विरोधी पथकाने प्रतिबंधात्मक कारवाई केलेली असून त्याचेवर लक्ष ठेवून असलेने टोळी विरोधी पथकाला वरील मोक्का अंतर्गत जामिनावर असलेला कुख्यात गुन्हेगार अनिकेत गावंडे यास जेरबंद करण्यात यश आले. त्यास ताब्यात घेवून बाभुळगांव पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.
    सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ कु.माधूरी बाविस्कर मॅडम स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ प्रभारी प्रदिप शिरस्कर पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली टोळी विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलन कोयल, ऋृषी ठाकूर, संजय दूबे, अमोल चौधरी, विनोद राठोड, नितीन खवडे, प्रतिक्षा केने, योगेश गटलेवार, गणेश देवतळे यांनी पार पाडली.