Home महाराष्ट्र असाही अनोखा प्रेम शेवटी दोघे सोबतच गेले ???

असाही अनोखा प्रेम शेवटी दोघे सोबतच गेले ???

301

 

गावावर पसरले दुःखाचे सावट ,

अमीन शाह ,

राशिवडे बुद्रुक ‘
पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पतीनेही आपली जीवन यात्रा आटोपली . दोघांच्या आजवरच्या सोबतीचा शेवटही सोबतच झाल्याने गावकरी हळहळले . येळवडे ( ता . राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील वृद्ध दाम्पत्याच्या बाबतीत नुकतीच घडलेली घटना .
याबाबत अधिक माहिती अशी , सखुबाई हरी पाटील ( वय 82 ) आणि हरी विठोबा पाटील ( वय 90) हे शेतकरी दाम्पत्य . आपल्या तोकड्या शेतजमिनीवर संसार फुलवणारे आणि त्यातून मिळणाऱ्या पिकासह दुभत्या म्हसीवर उदरनिर्वाह चालवून आपल्या पोराबाळांना सांभाळून मोठे केलेले जोडपं . तीन मुली , दोन मुले यांना मोठं करून , शिकवून त्यांचे संसार थाटले आणि अखेरपर्यंत कष्टात आयुष्य काढले . बघता – बघता मुलांच्या संसार वेलीवर फुले फुलली , परतवंडे आली . प्रत्येकाचे संसार वेगळे झाले . तरीही या कष्टकरी शेतकरी दांपत्याला आपल्या काळ्याआईची सेवा केल्याशिवाय राहवत नव्हतं . अगदी परवा परवापर्यंत डोक्यावरचा वैरणीचा भारा खाली आला नव्हता . गेल्या चार – पाच वर्षात पाय थकले , शरीराने साथ सोडली , तेव्हाच ते अतिश्रमाने घरीच थांबले . एकमेकांचा आधार घेत आणि आधार देत . या काळात मुलही त्यांच्याकडे वात्सल्याने पाहत होती . अखेर अनेक वर्षाची सोबत त्यांनी एकाच स्मशानात एकाच दिवशी आपल्यावर अंत्यसंस्कार घेऊन केली . सखुबाई यांचे सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले . हे कळताच त्यांचे पती हरी यांनी हाबकी घेतली . दिवसभर त्यांना शोक अनावर झाला . घरातील सर्वजण आईचा शोक व दुःख सावरत असतानाच मध्यरात्री त्यांनीही अखेरचा श्वास घेतला . यामुळे आजवर एकोप्याने आणि एक साथीने जीवन जगलेल्या या दाम्पत्याचा शेवटही सोबतीने झाला . याचे परिसरात आश्चर्य व हळहळ व्यक्त होत आहे . सखुबाई भरल्या मळवटाने गेल्या आणि धनी पाठोपाठ .