Home मराठवाडा इंडिया बॅंकेत घुसला कोरोना , दोन कर्मचारी पाॅझिटीव्ह…!

इंडिया बॅंकेत घुसला कोरोना , दोन कर्मचारी पाॅझिटीव्ह…!

287

जालना- लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथील बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी स्वतःहून टेस्ट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता त्यांची एंटीजन टेस्ट केली असता दोन कर्मचारी पॉझिटिव्ह अाले व बँकेमधील आणखी पाच कर्मचारी यांची टेस्ट घेणे बाकी आहे. त्यांची टेस्ट उद्या करण्यात येईल. दरम्यान, या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात किती लोक आले आहेत? संपर्कातील लोक कोणकोणत्या गावचे आहेत? या बाबतीत चौकशी करून त्या त्या गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना त्या लोकांची माहिती देऊन त्यांची टेस्ट करण्यात येणार आहे. असे प्राथमिक आरोग्य केंद्र राजुर च्या वतीने सांगण्यात आले . सदरील पॉझिटिव्ह कर्मचारी यांना भोकरदन येथील कोरोना सेंटर येथे पाठवले होते परंतु त्यांनी सांगितले की, आम्ही जालना येथे राहत असून आम्हाला जालना येथे पाठवा म्हणून सदर कर्मचारी हे जालना येथील कोविड सेंटर मध्ये पुढील उपचारासाठी पाठवले आहेत.