Home रायगड पनवेल डी.डी. विसपुते बी.एड.महाविद्यालयात “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस उत्साहात संपन्न”

पनवेल डी.डी. विसपुते बी.एड.महाविद्यालयात “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस उत्साहात संपन्न”

134

अलिबाग – आदर्श शैक्षणिक समूहाचे, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल व बोर्ड ऑफ स्टडीज, शिक्षणशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१२/०८/२०२० रोजी “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस” हा कार्यक्रम आँनलाईन आयोजित करण्यात आला होता.
झेप घेणाऱ्या पंखाना ज्ञानाचे बळ देणारी
पुस्तके…
जीवनात आनंदाचे
सप्तरंगच उधळतात…
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे ग्रंथालय विभागाचे प्रमुख मा.डॉ.मधुकर शेवाले सर, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सर, मुंबई विद्यापीठ, ठाणे सब कॅम्पस च्या डायरेक्टर मा.डाॅ.सुनिता मगरे मॅडम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.सीमा कांबळे मॅडम, आणि त्यांचा सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यापीठ गीताने सदर कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या नंतर ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस्.आर. रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी एक ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. एम.एड्., बी.एड्., व बी.लिब. च्या स्नेहा पाटील व श्रेयस रोडे या विद्यार्थ्यांनी प्रस्तुत कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करत ग्रंथालयाचे महत्व स्पष्ट केले… प्रमुख अतिथी मा.डॉ.सुनिता मगरे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत या covid-19 नंतर पुन्हा कशी सुरुवात करता येईल या बाबत मार्गदर्शन केले. आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी आदर्श समूहाची ग्रंथालया संदर्भातील भूमिका स्पष्ट करत आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार काय नवीन स्वीकारता येईल यावर भाष्य करत सर्वांना एक नवी दिशा दिली तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.डॉ.मधुकर शेवाले सर यांनी ग्रंथालय शास्त्रातील अनेक बाबींवर भाष्य करत ग्रंथालयाचे व ग्रंथपालांचे महत्व विषद केले व सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ.सीमा कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.