Home मराठवाडा साधू-संतांना त्रास देणारी निती अजूनही कायम, छळ असह्य होत असल्याचा स्वामी अद्वैतानंद...

साधू-संतांना त्रास देणारी निती अजूनही कायम, छळ असह्य होत असल्याचा स्वामी अद्वैतानंद महाराजांचा आरोप

305

लक्ष्मण बिलोरे

जालना – मराठवाडा विभागातील बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी काठी वसलेल्या रामपुरी येथील लिंबराज महाराज संस्थान येथे काही दिवसापूर्वी ट्रस्ट स्थापन करुन संन्याशी हभप अव्दैतानंद स्वामी महाराज यांना अध्यक्ष ( मठादिपती) स्थान देण्यात आले. महाराजांनी संस्थानच्या माध्यमातून रामपुरीत धार्मिक कार्यक्रम सुरु केले. स्वामी अद्वैतानंद महाराज यांनी संस्थान चे विकास कार्य केल्याने येथील एक व्यक्ती हे स्वामी महाराजांना जाणीवपूर्वक ञास देऊन विकास कार्य करण्यासाठी आङकाठी करत आहेत, असा आरोप स्वामी अद्वैतानंद महाराज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला, यामुळे गेवराई तालुक्यात असंतोष निर्माण झाला आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या गेवराई

तालुक्यातील रामपुरी येथे गेल्या तिन वर्षापुर्वीपासुन संन्यासी हभप अव्दैतानंद स्वामी महाराज यांनी लिंबराज महाराज संस्थानचा विकास करत धार्मिक विधी करुन धर्म कार्य सुरु केले आहे. अव्दैतानंद स्वामी महाराज यांच्या संन्याशी व धर्माकार्याचा विचार करुन गावकऱ्यांनी काही दिवसापूर्वी लिंबराज महाराज ट्रस्ट स्थापन करुन ह भ प आव्दैतानंद स्वामी महाराज यांना पदसिध्द अध्यक्ष मठाधिपती केलेले आहे. लिंबराज संस्थानचा विकास व प्रगती पाहुण गावातील एक
ब्राह्मण ग्रहस्थ जानुन बुजुन स्वामी महाराज यांना ञास देत असुन कुटनितीचा अवलंब करून षङयञ रचत आहेत. असा अद्वैतानंद स्वामी महाराज यांचा आरोप आहे. धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी ञास देत आहेत. हे गावातील नागरिकांना वाईट व खोटी माहिती देऊन ह भ प आव्दैतानंद स्वामी महाराज यांना बदनाम करत आहेत. वाईट व बदनाम कारक षङयञ करुन लिंबराज महाराज संस्थान च्या विकासाला आडकाठी आणत आसल्याने गावकर्यांनी वेळीच लक्ष घालुन हा वाद मिटवण्याची गरज आहे. यापुढेही हभप आव्दैतानंद स्वामी महाराज यांना सदर व्यक्तीकडून आरोप प्रत्या आरोप व षङयञ करुन बदनाम केल्यास या प्रकरणात सर्वसहीत जबाबदार सदरची व्यक्ती राहिल, अशी माहीती हभप आव्दैतानंद स्वामी महाराज यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.