Home परभणी धनगर साम्राज्य सेनेचे संपर्कप्रमुख प्रमुख रविकांत हारकळ मंगळवारी हिंगोली दौऱ्यावर

धनगर साम्राज्य सेनेचे संपर्कप्रमुख प्रमुख रविकांत हारकळ मंगळवारी हिंगोली दौऱ्यावर

632

जवळाबाजार – प्रतीनिधी

परभणी – धनगर साम्राज्य सेनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख रविकांत हारकळ शहापुरकर हे उद्या मंगळवारी( 3 ऑगस्ट)हिंगोली दौऱ्यावर येत आहेत.
धनगर साम्राज्य सेनेच्या स्थापनेपासूनच सक्रिय असलेले धनगर साम्राज्य सेनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख रविकांत हारकळ +918830843281
उद्या मंगळवारी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर हे परभणी ची लोकसभा 2019 निवडणूक लढवत असताना हारकळ यांनी प्रचाराची महत्त्वाची धुरा सांभाळली होती. हारकळ हे परभणी वरून हट्टा ,जवळाबाजार, औंढा नागनाथ, हिंगोली मार्गाने येतील. वाटेत कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करत कार्यकर्त्यांच्या भेटी आणि नियुक्तीपत्र वाटप केले जाणार आहेत. दुपारी हिंगोलीत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी नंतर ते नरसी नामदेव याठिकाणी दर्शनासाठी जाणार आहेत.बुधवारी सकाळी त्यांच्या नियोजित वेळेनुसार परत परभणी कडे जातील. हरकळ यांच्या दौऱ्याचा हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहान औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष एकनाथ आव्हाड 9420196825यांनी केलै आहे.