Home मुंबई फाईट फॉर राईट फाउंडेशन ने केली अदानी इलेक्ट्रीसिटी च्या वीज बिलांची होळी…!

फाईट फॉर राईट फाउंडेशन ने केली अदानी इलेक्ट्रीसिटी च्या वीज बिलांची होळी…!

202

मुंबई – सुरेश वाघमारे

लॉकडाऊन दरम्यान अन्यायकारक वीजबिले पाठवून जनतेची पिळवणूक करणाऱ्या अदानी इलेक्ट्रीसिटी विरुद्ध जनतेमध्य उफळलेल्या रोशाची दखल घेत मा. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी योग्य वीज बिले पाठविण्यात यावी असे आदेश दिले, त्यानुसार अदानी इलेक्ट्रीक यांनी जनतेकडून वीज मीटरचे फोटो मागविले..

परंतु तरी सुद्धा या महिन्याच्या वीज बिलामध्ये मागील वाढीव बिलाची रक्कम जोडीत पुन्हा अन्यायकारक वाढीव बिले पाठविली आहेत.
सरकारच्या आदेशाला व जनतेच्या रोषाला काडीचीही किंमत न देता आपली मनमानी करणाऱ्या अदानी इलेक्ट्रीसिटी यांच्या मनमानी कारभाराचा आणि वाढीव अन्यायकारक विजबिलाचा निषेध करित फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी विज बिलांची होळी मालाड पश्चिम येथील त्यांच्या कार्यालया बाहेर केली. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष योगेश केणी, सचिव मंथन पाटील, उ.मु.जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे, मालाड विधानसभा सचिव गणेश परदेशी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..