
नाशिक विभागाच्या सहसचिव पदी अँड. सुरेंद्र सोनवणे यांची निवड
नाशिक , दि. १९ :- ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक विभागाची बैठक नुकतीच ऑनलाइन मिटिंग मोठ्या उत्साहात पार पडली व सदरची मिटिंग कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ठरली. या सभेस नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या पाच जिल्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिक विभाग अध्यक्ष श्री. बाबासाहेब जोशी यांनी कार्यकर्त्यानसाठी संघटनेच्या कार्यशैली विषयी माहिती दिली. तसेच स्वलिखित कार्यकर्ते तुमच्या साठी पुस्तक वाचण्याचे व ग्राहकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. आजच्या ऑनलाईन मिटिंगच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास आशीर्वाद दिलेत. व ऑनलाइन मिटिंग सुरु करण्यास सांगितले.
नाशिक विभाग संघटक श्री. अरुण भार्गवे सदरच्या ऑनलाईन मिटिंग साठी शुभेच्छ्या देवून संघटन, प्रचार, प्रसार, तालुका नेमणूक, लेखणी युद्ध, याबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा पदाधिकारी यांनी आपले कामे निश्चित करून घेऊन कामे करावीत असे सांगितले. सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन मिटिंग सारख्या वेळ, काळ, व पैसा वाचवणाऱ्या बैठका ह्या नियमित स्वरुपात व नियमित व्हाव्यात, जिल्हा पदाधीकारींनी प्रचार प्रसार बाबत महत्वाची भूमिका बजवावी, तालुक्यातील संघटन मजबूत करावे. तालुक्यातील टिम उभी करावी. संघटनेत विविध स्तरातील नवनवीन कार्यकते घ्यावेत.
नवीन कार्यकर्त्यांसाठी व ग्राहक प्रबोधनासाठी ग्राहक चळवळ बाबत माहिती नियमित देणे, तसेच ग्राहक संरक्षण कायदा तसेच वेगवेगळे माहिती साहित्य उपलब्ध करून त्यावर ऑनलाइन परीक्षा घेऊन प्रमाणपत्र दिले जाईल.
तालुका, जिल्हा स्तरावर केलेल्या कामांची लेखी नोंद करुन विभागाकड़े पाठविणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच नाशिक विभागच्या जिल्ह्यातील पत्रकार, पोलीस अधिकारी, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्था यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक विभागाकडून केला जाणार करण्यात येणार आहे.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या सहसचिव पदी अँड. सुरेंद्र सोनवणे यांची राज्य कार्यकारणीने निवड केली असल्याची माहिती नाशिक विभाग अध्यक्ष श्री. बाबासाहेब जोशी यांनी दिली.
ग्राहकांच्या मार्गदर्शना साठी विभागीय स्थरावर नाशिक विभाग ग्राहक मार्गदर्शन समिती जाहीर केली. विज, सहकार, बैंक, शिक्षण, विमा, शेती यासाठीचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर विभागीय मार्गदर्शन समितीची जाहीर करण्यात या समितीत विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची नियुक्ती केली, त्यामुळे ग्राहकांचे तालुका, जिल्हास्तरावर न सोडणारे प्रश्न लवकरात लवकर सुटतील अशी आशा व्यक्त केली.
विभागीय मार्गदर्शन समिती – श्री. रमेश वाघ – नाशिक , श्री. अरुण भार्गवे – नाशिक, अँड. राजेंद्र खंदारे– नाशिक, अँड. सुरेंद्र सोनवणे– नाशिक, अँड.. जे. टी. बापूसाहेब देसले- धुळे, अँड. श्रीधर व्यवहारे– नाशिक, श्री. हिरालाल ठाकूर– नाशिक, श्री. सुधीर काटकर– नाशिक, प्रा. डॉ. ए. बी. महाजन- नंदुरबार, श्री. प्र. ह.दलाल – जळगाव, श्री गजेंद्र क्षीरसागर – अहमदनगर
या मिटिंगमध्ये विभागीय अध्यक्ष प्रा. बाबासाहेब जोशी, उपाध्यक्ष श्री. रणजीत श्रीगौड, विभागीय संघटक श्री. अरुण भार्गवे, विभाग सचिव डॉ. अजय सोनवणे, विभाग सहसचिव अँड. सुरेंद्र सोनवणे, नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री. सुधीर काटकर, संघटक श्री.दत्ता शेळके, प्रवासी महासंघाचे श्री. उल्हास शिरसाठ, नाशिक महानगर संघटक श्री. प्रशांत देशमुख, सचिव श्री. प्रकाश जोशी, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. ए. बी. महाजन, नंदुरबार जिल्हा सचिव श्री. श्रीकांत मनोहर पाठक, सह सचिव श्री. आर. ओ मगरे, जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. प्र. ह.दलाल, संघटक श्री. सतीष गड़े, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री गजेंद्र क्षीरसागर, जिल्हा संघटक श्री. शब्बीर शेख, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. गोरख बारहाते राहता संघटक अनंत गाँधी, धुळे जिल्हा अध्यक्ष अँड.. जे. टी. बापूसाहेब देसले, धुळे जिल्हा संघटक श्री. रवींद्र महाजनी, प्रा. चंद्रकांत डागा, श्री.सुरेश पारख, श्री. गजेंद्र खांडे, श्री. राजेश चौधरी, श्री. रविन्द्र महाजनी, श्री. अशोक सूर्यवंशी, श्री. सुबोध चौधरी, श्री. पी. झेड कुंवर, श्री. सुरेश मोरे, श्री. क्षीरसागर, श्री. संदीप नगरकर, श्री. संजय शुक्ला, श्री. अण्णा धुमाळ, श्री. अशोक सूर्यवंशी, श्री.डॉ. गजेंद्र ढोले, श्री. गोविंद पाटील, श्री.जगदीश बोरसे, श्री. महाजन सर, श्री. नाना पाटील, श्री. नरेश पांडव, श्री. निलेश देशमुख, श्री. महेंद्र गुजर, श्री. सुरेश मोरे, श्री. वरून वर्मा, श्री. सत्यनारायण वैष्णव, श्री.संजय पाचपोळे, श्री. प्रकाश बेंद्रे, श्री. संदीप नगरकर, श्री. विनोद अहिरे, अॅड. राजेन्द्र शेवाळे, श्री. किरण बोडके, श्री. महादू हिरमोडेसौ. मोहिनी, सौ. सुजाता मेहेत्रे, यांच्या सह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर जिल्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सह भाग घेतला.
उपस्थितांनी ऑनलाईन व्हीडियोच्या माध्यमातून एकमेकांना पाहण्याचे व बोलण्याचे समाधान आणि कार्यवृत्तांताची देवाण घेवाण झाल्याने समाधान व्यक्त केले व ऑनलाईन बैठकीच्या यशस्वी प्रयोगाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले व भविष्यातही प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे असेच विविध प्रयोग व बैठकांचे आयोजन व्हावे, व अश्या बैठकांना जास्तीत जास्त कार्यकर्ते सहभागी होतील. अशी आशा व्यक्त केली.
या सभेचे सूत्रसंचलन व आयोजन अँड. सुरेंद्र सोनवणे यांनी केले व डॉ. अजय सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. बैठक खेळीमेळीत, उत्साहात संपन्न झाली.
जागो ग्राहक जागो,
➖➖➖➖ ➖➖➖➖









































