Home जळगाव रावेर तालुक्यातील शासनातर्फे नोंदणीकृत झालेल्या सर्व शेतकऱ्यांचा मका मोजण्यात यावा – युवासेना...

रावेर तालुक्यातील शासनातर्फे नोंदणीकृत झालेल्या सर्व शेतकऱ्यांचा मका मोजण्यात यावा – युवासेना रावेर

207

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी मका मोजणीसाठी नोंदणी केलेली आहे पण अद्यापही काही शेतकऱ्यांचा मका मोजला गेला नाहीय तो राहिलेला शेतकऱ्यांचा मका लवकरात लवकर मोजला जावा या आशयाचे निवेदन युवासेना उपतालुका प्रमुख प्रवीण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री यांच्या कडे ई-मेल द्वारे दिले आहे…!!

आमच्या ता. रावेर जिल्हा जळगांव येथील 1200 शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदीसाठी नोंदणी केलेली असून केवळ 289 शेतकऱ्यांचा मका शासनातर्फे मोजण्यात आलेला आहे…

तरी रावेर तालुक्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांचा मका मोजता यावा या करिता आपण मुदत वाढवून द्यावी जेणेकरून सर्वत्र बाजूने शेतकरी भरडला जात आहे त्यात अनेक शेतकऱ्यानं आपला मजा नोंदणी केलेली असून लवकरचं खरेदी होईल या आशेवर असून सुरू असलेल्या कोरोना महामारीचा त्यांना सामना करावा लागत आहे.. आम्ही आमच्या वतीने व संपूर्ण शेतकरी वर्ग यांच्या वतीने विनंती करतो की शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा….!!

रावेर तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणींना सामोरे जात असतांना त्यांना देशावर आलेल्या या महाभयंकर कोरोना महामारीचा सामना करत असतांना त्यांना अनेक अडचणी येत आहेत…

अशातच ज्या शेतकऱ्यांचा मजा नोंदणी झालेला असून तो मोजण्यात येत नाहीय म्हणून काही शेतकऱ्यांच्या तक्रारी युवासेना तालुका प्रमुख प्रवीण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांच्या कडे येऊ लागल्याने त्यांनी खुद्द राज्याचे कृषिमंत्री यांच्या कडे ही माहिती दिली आहे…

राज्याचे कृषिमंत्री माननीय दादाजी भुसे साहेब सदैव शेतकऱ्यांसाठी कार्यतत्पर असल्याने दिलेल्या निवेदनाची मंत्री महोदय दखल घेऊन लवकरच रावेर तालुक्यातील मका खरेदी केंद्र ला लवकरात लवकर मुदत वाढून मिळेल व राहिलेल्या शेतकऱ्यांचा मका मोजला जाईल अशी आशा युवासेना तालुका प्रमुख प्रविण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी व्यक्त केली आहे…!!