Home बुलडाणा मका खरेदी केद्र अचानक बंद झाल्यामुळे शेतकरी हवालदील..

मका खरेदी केद्र अचानक बंद झाल्यामुळे शेतकरी हवालदील..

37
0

*युवक काँग्रेस नेते अँड.विजयसिग राजपुत यांचे ठिय्या आंदाेलन.*

अंत्री ता. माेताळा :- दि- १४ जुलै २०२०.: (मंगळवार) – अंत्री येथील मका खरेदी केद्र शासनाने अचानक बंद केल्यामुळे शेतकरी बांधव हवालदील झाले. ही बाब समजताच युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव अँड. विजयसिग राजपुत यांनी खरेदीकेंद्राला भेट देवुन शेतकरी बांधवाशी चर्चा करुन त्यांच्या समस्या समजुन घेत चार तास ठिय्या आंदोलन केले. दुपारी साडेअकरा ते साधारण साडेतीन वाजेपर्यत ही ठिय्या आंदाेलन चालु हाेते.आंदोलनाची माहिती तहसिलदार कुमरे यांना मिळताच तहसिलदार कुमरे यांनी लगेच या मका खरेदी केद्राला भेट दिली तेव्हा विजयसिंग यांनी तहसिलदारांना शेतकरी बांधवाच्या समस्या सांगुन मका खरेदी लवकरात लवकर सुरू करण्याच्या बाबतीत एक निवेदन दिले..तेव्हा माेठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित हाेते.
*प्रतिनिधी अकील कुरेशी ता.मोताळा जि. बुलडाणा*

Unlimited Reseller Hosting