कृषि व बाजार

कापसाच्या (शासकीय हमी भावाने) विक्रीसाठी शेतकऱ्यांनी २५ मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी

Advertisements
Advertisements

नांदेड , दि. २३ ( राजेश एन भांगे ) – जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शिल्लक असलेला कापूस शासकीय हमीभावाने विक्रीसाठी पुढे दिलेल्या ऑनलाईन लिंकवर सोमवार 25 मे 2020 पर्यंत शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी करावी. त्यानंतर संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना लघु संदेश पाठविण्यात येणार असून लघु संदेशामध्ये नमूद दिनांकाला शेतकऱ्यांनी सातबारावरील पीक पेरा व उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधित खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावयाचा आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर (Social distance) व स्वच्छतेचे पालन करून खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडावे, असे आवाहन नांदेडचे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शिल्लक असलेला कापूस शासकीय हमीभावाने खरेदी होणेसाठी भारतीय कापूस निगम (सीसीआय) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित (MSCCGMF) मुंबई यांच्यामार्फत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शनिवार 25 एप्रिल 2020 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या ऑनलाईन लिंकवर प्राथमिक नोंदणी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येत आहे. परंतू जिल्ह्यात अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन लिंकवर प्राथमिक नोंदणी केली नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे कापूस शेतकऱ्यांना नोंदणीसाठी लिंक सुरू करण्याची मागणी नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी ही ऑनलाईन लिंक पुन्हा सुरू करण्यात येत असून सदर लिंक तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.

तालुका ऑनलाईन लिंक

माहूर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdzcWe3QebRrQsdsIlMVulNoE0D1lWNY640OUdzfvAVGLi-Zg/viewform?usp=sf_link

किनवट https://forms.gle/2cK6Jq4KJcx3iSeN7

कंधार व लोहा https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEQfYAAhXbiMJMiQj6CuT2vL0uDw6Xeq1eUc228fwJ4kuw0A/viewform

नायगाव व बिलोली https://forms.gle/75pkzNgvSPeSVJ1w5

मुखेड https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScTAtU_P3UtS3mv8Saa8VUu_XP_8WQr_2cCrmw8yPXpo7qYKQ/viewform?usp=sf_link

धर्माबाद https://forms.gle/p6TsjVDRXjKTBSpR6

उमरी https://forms.gle/6z5EJs942vzyj5NdA

हदगाव व हिमायतनगर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeKzK4j5wB9C0NLZ491EAV2Bu__dGFiYWI6aQDBGY1v3YomIA/viewform?vc=0&c=0&w=1

भोकर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeFWNzoqbxLAHF7xSWIrf4EiCNKrx1H6fNFsM_f-wBzqaLo8w/viewform

देगलूर https://drive.google.com/open?id=19v5BUv4Mu6LKZaZbTmQLMa7KUd6xnFZgZyinbrr7PlQ

नांदेड, अर्धापूर व मुदखेड https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeQJTeiXq238EALuS6dKeeFymetSi_UVGomZlmDf1rN7LjQYA/viewform?usp=sf_link

महसूल प्रशासनाने दिलेल्या या ऑनलाईन लिंकवर शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी सोमवार 25 मे 2020 पर्यंत प्राथमिक नोंदणी करावी. एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर यापुर्वी कापूस विक्री झालेली असल्यास त्यांचे नावावर पुन्हा कापूस खरेदी केली जाणार नाही. नॉन एफएक्यु (Non FAQ) दर्जाचा कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी तसेच खाजगी बाजार समित्यांना परवानगी देण्यात आली आहे. कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने पणन संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तालुका स्तरावर उप / सहायक निबंधक, सहकारी संस्था, कापूस पणन महासंघाचे प्रतिनिधी व बाजार समितीचा सचिव यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे, अशी माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

अमळनेर तालुक्यात सततच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान… मागील वर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तोंडावर आलेला घास जाणार

रजनीकांत पाटील अमळनेर :- यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून नदी नाले तलाव तुडुंब ...
विदर्भ

आलेगांव परिसराला चक्रीवादळासह गारपीट,मुसळधार पावसाचा तडाखा , ” शेकडो वृक्ष उन्मळून पडले”

आमदार नितीन देशमुख यांनी नुकसान पिकाची केली पाहणी. शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे लाखो रुपयांचे नुकसान चोंढी,चारमोळी गावांचे ...
कृषि व बाजार

पोखरा प्रकल्पाचीअंमलबजावणी समाधानकारक नसल्यास कारवाई – कृषी मंत्री दादाजी भुसे

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार लाभार्थ्यांशी फोनद्वारे साधला थेट संवाद कृषी विषयक बाबींचा घेतला आढावा वर्धा दि ...
कृषि व बाजार

शेतकऱ्यांनी उपकर योजनेत कृषि साहित्यासाठी प्रस्ताव सादर करावेत – कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर

नांदेड , दि.१६ ( राजेश एन भांगे ) – जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेंतर्गत अनुदानावर कृषि ...