Home विदर्भ गणगाव येथे महादेव मंदीराजवळ देशी दारुची विक्री…!

गणगाव येथे महादेव मंदीराजवळ देशी दारुची विक्री…!

165

देवानंद जाधव

यवतमाळ – तालुक्यातील आर्णी पोलिस ठाण्या अंतर्गत गणगाव (साकुर) येथे महादेव मंदीराजवळ देशी दारू खुलेआम विकली जात आहे.

“” लंगडा “””नामक हरामखोर गेल्या अनेक दिवसांपासून गावात अशांतता निर्माण करुन गोजिरवान्या गावाला पेटविण्याचे पाप करत आहे. लंगड्याच्या अनधिकृत देशी दारू च्या चिल्लर देशी आणि विदेशी दारु विक्री मधुन गावात दररोज भांडणे सुरू झाली आहे. मद्य पिऊन अनेक दारुडे मंदीराजवळ थुंकतात. त्यामुळे गणगाव मध्ये शांतता भंग झाली आहे. त्यामुळे गावात कधीही सामाजिक आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किसन सुरजुसे आणि गणगाव येथील तमाम महीला बचत गटाने वेळोवेळी तक्रार दाखल केली. माञ त्यांच्या नशिबी अखेर निराशाच आली. गावाला आग लागण्यापूर्वी आरणी पोलिस ठाण्याने गणगाव च्या “” लंगडा “” नामक देशी दारू विकुन अशांतता निर्माण करणार्या हरामखोरा वर तातडीने कारवाई करुन मुसक्या आवळाव्या अशी गणगाव वासीयांकडुन मागणी होत आहे.