Home उत्तर महाराष्ट्र रेल्वे तिकिटासाठी पैसे नसलेल्या कामगारांना असं मिळालं तिकिट

रेल्वे तिकिटासाठी पैसे नसलेल्या कामगारांना असं मिळालं तिकिट

176

लियाकत शाह

लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे. हाताला रोजगार नसल्याने खायचे हाल होत असल्याने कामगार आपल्या गावची वाट धरत आहेत. दरम्यान मनं हेलवणारा प्रसंग नाशकातून समोर आला. नाशिक रोडहून कामगारांना घेऊन स्पेशल ट्रेन लखनऊसाठी रवाना होत होती. कामगारांसाठी ४७० रुपये भाडं आकारण्यात येत होतं. दीड महिन्याहून अधिक काळ रोजगार नसल्याने कामगारांकडे तिकीटासाठी देखील पैसे नव्हते. नाशिक जिल्ह्यातील तहसिलदार आणि नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी आणि कामगारांनी मिळून पैसे गोळा करत तिकीट खरेदी केली. त्यानंतर कामगारांना गाडीत बसायला मिळालं. ‘जागरण’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.