Home रायगड कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

250

कर्जत – जयेश जाधव

तालुक्यातील मौजे आवळस या आदिवासी वाडीतील एका अल्पवयीन मुलीवर त्याच वाडीतील एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कर्जत पोलिस ठाणे हद्दीत काल दि. २२ एप्रिल रोजी १२.४५ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मौजे आवळस येथील आदिवासीवाडी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आहे हे येथे राहत असलेल्या आरोपी अरूण हरिश्चंद्र वाघमारे यास माहित असून देखील तसेच त्याचे लग्न झालेले असताना देखील त्यानी फिर्यादी यांचे अल्पवयीन मुली बरोबर जबरदस्तीने जबरी संभोग केला, त्याबाबत फिर्यादीने आरोपीस विचारणा केली असता आरोपी अरूण हरिश्चंद्र वाघमारे याने फिर्यादीस मारण्याची धमकी दिली.
याबाबत कर्जत पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर ९१/२०२० भा.द.वि कलम ३७६,५०६ बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक अधिक तपास सपोनि/पाटील हे करीत आहे.